शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

'मंकी पॉक्स'ची दहशत, ठाणे महापालिकेने आरोग्य विभागाला दिला सतर्कतेचा इशारा; काय आहे लक्षणं वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 9:06 PM

ठाणे महापालिका प्रशासन मंकी पॉक्सबाबत गंभीर आहे. आतापर्यंत येथे एकाही रुग्णाची पुष्टी झालेली नाही.

ठाणे

ठाणे महापालिका प्रशासन मंकी पॉक्सबाबत गंभीर आहे. आतापर्यंत येथे एकाही रुग्णाची पुष्टी झालेली नाही. हा स्थलांतरित संसर्गजन्य आजार आहे. तो कधीही झपाट्याने पसरू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेने आरोग्य विभागाला सतर्क केल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

प्राण्यांपासून पसरणाऱ्या या संसर्गजन्य आजाराबाबत महापालिका आरोग्य विभाग निश्चितच सतर्क झाला आहे. पालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेवरून मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग, महानगरपालिकेच्या ३० आरोग्य केंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांना मार्गदर्शक सूचना जारी करून दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय कोणत्याही संशयित रुग्णांची तपासणी करून नमुने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही), पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील, अशा रुग्णांची यादी तयार करून त्यांची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. 

मंकीपॉक्स हा प्राण्यांद्वारे पसरणारा विषाणूजन्य संसर्गजन्य आजार आहे. तो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय पर्जन्यमान भागात आढळतो आणि अधूनमधून संसर्गाची प्रकरणे इतर भागात दिसून येत असल्याची माहिती ठामपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी प्रसाद पाटील यांनी दिली.

अशी आहेत लक्षणे-मंकीपॉक्समध्ये सामान्यत: ताप, पुरळ आणि सूज यासारखी लक्षणे दिसतात. त्यामुळे अनेक वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकते. ही लक्षणे सहसा दोन ते चार आठवडे दिसतात आणि हळूहळू बरी होतात. काहीवेळा प्रकरणे गंभीर असू शकतात आणि या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण एक ते दहा टक्क्यांपर्यंत असते. हा आजार प्राण्यांपासून मनुष्यामध्ये आणि नंतर मनुष्यापासून इतर मनुष्यांमध्ये पसरू शकतो. विषाणू तुटलेली त्वचा (दिसत नसली तरीही), श्वसनमागार्तून किंवा श्लेष्मल पडद्याद्वारे (डोळे, नाक किंवा तोंड) शरीरात प्रवेश करतो. तसेच प्राण्यांपासून मानवापर्यंत चाव्याव्दारे किंवा ओरखडे, बुशमीट (वन्य प्राण्यांचे मांस), शरीरातील द्रवपदार्थ किंवा संक्रमित व्यक्तीचे कपडे, पलंग यांसारख्या जखमांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपकार्तून पसरू शकतात. हा आजार १ ते २१ दिवसांच्या दरम्यान पसरू शकतो

मानव-ते-मानव प्रसारण प्रामुख्याने मोठ्या श्वासोच्छवासाच्या कणांद्वारे होते असे मानले जाते, ज्यासाठी सहसा दीर्घकाळ जवळचा संपर्क आवश्यक असतो. मंकीपॉक्स रोगाचा विकास कालावधी साधारणत: ७ ते १४ दिवसांचा असतो, परंतु तो ५-२१ दिवसांचादेखील असू शकतो. या काळात व्यक्ती सहसा संसर्गजन्य नसतो. संक्रमित व्यक्ती पुरळ दिसण्यापूर्वी एक ते २१ दिवसांपर्यंत हा रोग पसरवू शकतो. जोपर्यंत सर्व पुरळ कमी होत नाही आणि बरे होत नाही तोपर्यंत संसर्गजन्य राहू शकतो, असेही डॉ. प्रसाद पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे