मीरारोड - गावच्या मालमत्तेच्या वादातुन शेजारी राहणारया १० वर्षाच्या मुलाच्या अंगावर माकड सोडल्याने माकडाने मुलाचे चावे घेऊन जख्मी केल्याची घटना काशिमीरा येथील मुंशी कंपाऊंड मध्ये घडली आहे.मुंशी कंपाऊंड मध्ये राहणारे असगर अली खान (४३ ) हे आपली पत्नी व ५ मुलांसह राहतात. भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय करणारया असगर यांच्या शेजारी हारुण अली खान (४०) राहतो. असगर व हारुण हे एकाच गावचे असुन दोघां मध्ये गावच्या मालमत्ते वरुन गेल्या २० वर्षां पासुन वाद आहे.त्यामुळे शेजारी असुनही दोघां मध्ये पटत नाही. हारुण देखील भंगारचा व्यवसाय करत असुन वर्ष भरा पुर्वी त्याने एक माकड पाळलेले आहे. २८ मार्च रोजी रात्री असगर यांचा ६ वीत शिकणारा १० वर्षाचा मुलगा फैजल हा घरा बाहेर अन्य मुलां सोबत खेळत होता. तर अगर देखील बाहेर बसले होते.त्यावेळी हारुण हा माकड घेऊन आला व फैजलच्या अंगावर सोडुन दिले. माकडाने फैजल याला कमरेवर, पाठीवर, मानेवर आदी ठिकाणी चावे घेण्यास सुरवात केली. असगर ने धाव घेऊन फैजलला माकडा पासुन सोडवले. नंतर जख्मी फैजल याला रुग्णालयात नेऊन उपचार केले. विषबाधा होऊ नये म्हणुन रॅबिजची लस देण्यात आली.दुसरया दिवशी या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात असगर यांनी उपरोक्त घटने प्रमाणे दिलेल्या फिर्यादी नुसार पोलीसांनी हारुण विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.हारुण याला अटक झाली नसली तरी माकड हे वन्य प्राण्यां मध्ये येत असल्याने बेकायदा माकड बाळगल्या प्रकरणी हारुण वर संबंधित कायद्या खाली पण गुन्हा दाखल केला पाहिजे होता. तसेच सादर माकडाची सुटका करायला पाहिजे अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे.
मालमत्तेच्या वादातून 10 वर्षाच्या मुलावर सोडले माकड अन्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 9:09 PM