ठाणे : पावसाळा सुरू झाल्यापासून ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण आणि शहरांत सर्पदंशाचे प्रकार वाढले आहेत. मागील चार महिन्यांत २०४ जणांना सर्पदंश झाला असून त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात वेळीच औषधोपचार मिळाल्याने ते बचावले आहेत. यात जून-जुलै महिन्यांत सर्पदंश झालेले १८० जण आहेत.
यंदा पावसाने कोकणपट्ट्यात दमदार हजेरी लावल्याने ठाणे व पालघर या जिल्ह्यांतील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांनाही जमिनीखाली राहणे असह्य झाले. त्यातूनच जमिनीवर वास्तव्यास आल्यावर जून महिन्यात १०३ जणांना, तर जुलै महिन्यात ७३ जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. एप्रिलमध्ये १५ आणि मे महिन्यात १३ जणांना सर्पदंश झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली. सर्व रुग्ण प्रामुख्याने ठाण्यासह पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत. एखादा सर्प चावल्यावर एकतर मानवी स्नायू आणि रक्त तसेच मेंदूवर विषाचा मारा करतो. तसेच त्याचे परिमाण मानवी शरीरावर तत्काळ सुरू झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे त्याच्यावर औषधोपचार केले जातात. औषधांची मात्रा ही रुग्णांवर होणाºया परिणामानुसार वाढवली जाते.वेळेत औषधोपचार होणे गरजेचेच्सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेळेत औषधोपचार मिळाल्यावर ती वाचते. मध्यंतरी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात मण्यारने दंश झालेल्या आजीबार्इंना वाचवण्यात यश आले होते.