शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

बीएसयूपीच्या २३८३ घरांचे महिनाअखेरीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:23 AM

आयुक्तांनी घेतला आढावा : बाधितांसह दिव्यांगांना लाभ

ठाणे : महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बीएसयूपी प्रकल्पांतर्गत एकाचवेळी जवळपास २३८३ इतक्या सदनिकांचे वितरण या महिनाअखेर प्रकल्पबाधितांसह दिव्यांगांना वितरित करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला. या निर्णयामुळे प्रकल्पबाधितांसह दिव्यांगांना आपल्या हक्काची घरे मिळणार आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी बीएसयूपी प्रकल्पांचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत तुळशीधाम येथे १६१ सदनिका, सागर्ली रिव्हर वूड्स, कल्याणफाटा येथे ९५, पडलेगाव ६५५, कासारवडवली ६३, ब्रह्मांड ३०, सिद्धार्थनगर, कोपरी (पू.) येथे २८०, खारटन रोड येथे १४४, महात्मा फुलेनगर, कळवा येथे १४३ आणि टेकडी बंगला येथे १८५ सदनिका महापालिकेस प्राप्त होणार आहेत.पायाभूत सुविधांची कामे त्वरित पूर्ण करायातील १४४२ सदनिका शहरातील विविध प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्या लोकांना प्राधान्याने वितरित करण्यात येणार आहेत. तसेच ७५२ सदनिका या अस्तित्वातील पात्र रहिवाशांना वितरित करण्यात येणार आहेत. १९० सदनिका या दिव्यांगांसाठी राखून ठेवण्यात आल्या असून त्याची सर्व प्रक्रि या करून त्या वितरित करण्याचे आदेश आयुक्तांनी या बैठकीत दिले.त्याचप्रमाणे गावदेवी येथील बाधितांना तसेच कळवा खाडीपूल येथील बाधित मातंग समाजाच्या लोकांनाही बीएसयूपीमधील सदनिका वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व ठिकाणांची पाहणी करून रस्ते, वीज, पाणी, मलनि:सारण व्यवस्था आदी कामे सुरू असतील, तर ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सर्व संबंधित विभागप्रमुखांना दिल्या. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग, मलनि:सारण विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग आणि स्थावर मालमत्ता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे