राजू ओढे ठाणे : सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळणाºया सतीश मांगलेच्या लॅपटॉपमधून तब्बल ४ हजार कॉल्स रेकॉडर््स पोलिसांना मिळाले आहेत. हे रेकॉर्ड्स कुणाचे आहेत, मांगलेने आणखी कुणाकुणाकडून खंडणी उकळली, हे तपास अधिकारी आता पडताळून पाहणार आहेत.रस्ते विकास महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची लाचेची मागणी करणारी ध्वनिफीत परत करण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी घेताना खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगले, त्याची दुसरी पत्नी मराठी अभिनेत्री श्रद्धा यांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गत गुरुवारी अटक केली होती. मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी मांगलेने त्यांचे कॉल रेकॉर्ड केले होते. असेच उद्योग मांगलेने इतरांसोबतही केले असतील, असा संशय पोलिसांना होता. डोंबिवली येथून अटक करताना पोलिसांनी मांगलेचा लॅपटॉप, मोबाइल फोन व इतर साहित्य हस्तगत केले. पोलिसांना त्यात तब्बल चार हजार कॉल रेकॉर्ड्स आढळले. ते तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.सतीश मांगले, त्याची दुसरी पत्नी श्रद्धा व मेहुणा अतुल तावडे यांची पोलीस कोठडी संपल्याने बुधवारी खंडणीविरोधी पथकाने त्यांना न्यायालयात हजर केले. सापडलेल्या कॉल रेकॉडर््सची माहिती पोलिसांनी न्यायालयाला देऊन, त्याची पडताळणी करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली.राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी सतीश मांगलेने त्यांचे कॉल्स रेकॉर्ड केले होते. मोपलवार यांच्यासोबत मोबाइल फोनवर बोलणारा आरोपी सतीश मांगलेच होता, हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. सतीशच्या आवाजाचे नमुने आणि कॉल रेकॉर्ड्समधील संभाषण पडताळून पाहण्यासाठी ते फोरेन्सिक लॅबकडे पाठवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन आरोपींचा शोधखंडणी प्रकरणात सतीश मांगलेसोबत आणखी दोन आरोपी सहभागी असल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. त्यापैकी एका आरोपीची भूमिका मध्यस्थासारखी आहे. दुसºया आरोपीने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. तो या गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. खंडणीविरोधी पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे.
मोपलवार प्रकरण; मांगलेकडे मिळाले चार हजार कॉल रेकॉर्ड्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 3:44 AM