शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

मॉरल पोलिसिंग गैरलागूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 2:27 AM

मीरा रोडमध्ये लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोलिसांनी कारवाई करत उच्चशिक्षितांना अटक झाली. आमच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा सरकार, पोलिसांना अधिकार कुणी दिला, असा दावा हे उच्चशिक्षित करतात व मॉरल पोलिसिंगला विरोध करतात.

- डॉ. उज्ज्वला करंडेमीरा रोडमध्ये लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पोलिसांनी कारवाई करत उच्चशिक्षितांना अटक झाली. आमच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा सरकार, पोलिसांना अधिकार कुणी दिला, असा दावा हे उच्चशिक्षित करतात व मॉरल पोलिसिंगला विरोध करतात. मात्र, मानसशास्त्रज्ञांना असे वाटते की, कुणाचेही मानसिक अथवा शारीरिक नुकसान करणाºया कृतीबाबत मॉरल पोलिसिंगचा मुद्दा गैरलागू आहे.लैंगिकता ही आदिम प्रेरणा आहे. भूक, तहान आणि लैंगिकता या तमाम प्राण्यांमध्ये आढळून येणाºया प्रेरणा आहेत. प्राण्यांमध्ये या प्रेरणांचे नियम कदाचित वेगळे असू शकतात. त्याचा तपशील प्राणिशास्त्रात मिळू शकतो. मानवी प्रेरणांचा विचार केल्यास मानवी प्रेरणा आणि अन्य प्राण्यांमध्ये असलेल्या प्रेरणापूर्ती यांच्यात फरक आहे. माणसाला संस्कृती आहे. त्याचे सांस्कृतिक अभिसरण झालेले आहे. सांस्कृतिकीकरणाचा विचार केल्यास त्याच्या प्रेरणा व गरजांची पूर्तता व शमन कशा प्रकारे व्हावे, याचे काही संकेत आहेत. लैंगिक ऊर्मी चाळवणे, ती अन्य मार्गाने पूर्ण करून घेणे, तिचे शमन करणे, हे पूर्वापार आहे. लैंगिक ऊर्मी या मानवी साहित्यविश्वासह कला आणि शिल्पकलेतून एकसारख्या प्रतीत आणि व्यक्त होत राहिलेल्या आहेत. मानवी संस्कृती प्रगत होत असताना तंत्रज्ञानही प्रगत होत आहे. तंत्रज्ञानाच्या डिजिटल क्रांतीमुळे स्वत:ला प्रगत म्हणवणाºया समाजाच्या व्यक्त होण्याच्या पद्धती आणि मार्ग यामध्येही बदल झालेले आहेत. त्याचा मानवी तनामनावर विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. अश्लील साहित्य पूर्वीपासून होते. व्हिडीओच्या मार्गाने ते अधिक धोकादायक पैलूंसह लोकांपुढे येत आहे. शिवाय, एका बाजूला उदारीकरणामुळे स्त्रियांचे चित्रण ज्या पद्धतीने रंगवले जात आहे, त्याच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत. हे सर्वत्र उपलब्ध असल्याने लैंगिक भावना सदैव उद्दिपित स्थितीत राहतात. त्याला वाट करून देण्यासाठी अनेक मार्ग शोधले जातात. पूर्वी ‘अतिसर्वत्र वर्ज्ययत्’ हा नियम होता. उदाहरण द्यायचे झाले, तर आपल्या बायकोसोबत लैंगिक नाते प्रस्थापित करतानादेखील संयमित स्वरूपात ते केले जात होते. त्याला काही मर्यादा होती. त्याचेही स्वरूप आता बदलले आहे. संयम हद्दपार झाला आहे. धीर राहिलेला नाही. त्याचे पुढचे पाऊल उचलले जात आहे. संयम म्हणजे दमन नव्हते. पोर्नोग्राफी लैंगिक भावभावनांचे दमन झाल्यामुळे पाहिली जाते, असे बोलले जात असले, तरी त्याला दमन हे कारण नाही. सदैव उद्दिपित स्थिती ही गोष्ट त्याला जबाबदार आहे.प्रकृती, संस्कृती आणि विकृती या गोष्टींविषयी बोलायचे झाले, तर प्रकृती म्हणजे एखाद्या गोष्टीची गरज असेल, तरच त्याचा उपभोग घ्यायचा. त्याची पूर्तता करणे, हे प्रकृतीला धरून असेल. संस्कृती म्हणजे एखाद्या गोष्टीची प्राकृतिक गरज निर्माण झाली आहे. तिचा उपभोग संयमित पद्धतीने घेणे म्हणजे संस्कृती. गरज भागलेली असताना तसेच भूक नसताना एखादी गोष्ट ओरबाडून घेणे, ही विकृती. उपभोगवृत्ती, चंगळवाद, अधाशी वृत्ती यातून गैरकृत्य वाढीस लागते.पोर्नोग्राफी, ब्ल्यू फिल्म हे आजच सोशल मीडिया अथवा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चोरून पाहिले जातात, असे नाही. यापूर्वीही पाश्चिमात्य देशांत छापील साहित्य होते. त्याचे लोण आपल्याकडेही आले. या छापील साहित्याची जागा दृकश्राव्य माध्यमांनी घेतली आहे. एखादा पोर्न व्हिडीओ तयार करणे, यामागे अर्थकारण असते. तो पसरवणे यात लैंगिक भावना चाळवणे, हा उद्देश असतो. अति उद्दिपितपणामुळे हे मार्ग अवलंबले जातात.पोर्नोग्राफीकडे लोक आकर्षित होतात, याचे कारण हल्ली सगळीकडेच लोकांच्या लैंगिक वासना चाळवल्या जातील, असे वातावरण आहे. निरनिराळ्या प्रसारमाध्यमांमधून नग्नतेचे जे प्रदर्शन होत आहे, त्यामुळे तमाम पुरुषवर्ग लैंगिकदृष्ट्या सदैव उद्दिपित राहतो व आपल्या लैंगिक गरजांचे शमन चांगल्यावाईट मार्गांनी झाले पाहिजे, अशा अवस्थेपर्यंत येतो. पोर्नोग्राफी पाहणे, हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न असू शकतो. पण, त्यासाठी अजाण वयातील मुलांचा वापर होत असेल आणि त्यामागे मोठे अर्थकारण दडले असेल, तर ते मात्र नुसतेच अनैतिक नाही, तर बेकायदेशीरही आहे. ज्या अश्लील व्हिडीओवर बंदी आहे, ते चोरट्या मार्गाने बनवणे आणि पाहणे, या दोन्ही गोष्टी समाजाच्या दृष्टीने घातक आहेत.लहान मुलांना पळवणाºया टोळ्या सध्या कार्यरत आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या घबराटीतून निष्पाप लोकांच्या हत्या घडत आहेत. या हत्यांच्या मुळाशी लहान मुले पळवली जाण्याचे कठोर आणि दाहक वास्तव आहे. मुले खंडणीसाठी पळवली जातात. खंडणी मिळाली नाही, तर त्याची प्रसंगी हत्या केली जाते. लोकांच्या मनात दहशत निर्माण केली जाते. प्रसंगी पळवण्यात आलेल्या मुलांकडून भीक मागण्याचा धंदा केला जातो. आता त्याच्याही पुढे या मुलांचा पोर्न व्हिडीओ तयार केला जातो. काही रॅकेट उघडकीस येतात, तर काही बिनबोभाट सुरू राहतात. त्यांना काही अंशी दुष्ट प्रवृत्तींचे पाठबळही असते. कुणाच्या तरी वासनापूर्तीसाठी भाबड्या जीवांचा वापर करून त्यांचा बळी देणे, त्यांचे लैंगिक शोषण करणे, त्याचा व्हिडीओ तयार करून तो साइट अथवा सोशल मीडियावरील चोरून चालवण्यात येणाºया ग्रुपवर टाकणे अथवा पसरवणे, हे निश्चितच अन्यायकारक आहे.मनोविकृतीशास्त्रामध्ये पिडोफिलिया म्हणजे बाह्यलक्षी लैंगिकता म्हणजे लैंगिक समाधानासाठी बालकांना लक्ष्य करणे, हा लैंगिक दुराचरणाचा प्रकार मानला जातो. या व्यक्ती लहान मुलांच्या माध्यमातून लैंगिक समाधान प्राप्त करून घेतात. अशा प्रकारचा दुराचार करणाºया व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात अडकत नाही, तोपर्यंत त्यांचा हा दुराचार राजरोस सुरू असतो. नंतर, मात्र न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांमार्फत प्रयत्न केले जातात. यापुढे त्यांच्या हातून आणखीन लहान मुलांचे लैंगिक शोषण होऊ नये, त्यांचा अर्थकारणासाठी वापर होऊ नये, हे पाहिले जाते. जी मुले अशा प्रकारे वापरली जातात, त्यांचे भावनाविश्व हादरून जाते. लहानपणी होणाºया लैंगिक अत्याचारांमुळे त्यांच्यामध्ये काही मनोविकृतीची लक्षणे निर्माण होण्याची दाट शक्यता असते. निरनिराळ्या संशोधनांमधून पुढे आलेली आकडेवारी असे सूचित करते की, अशा अन्यायग्रस्त मुलांमध्ये वियोजित ओळख विकृती म्हणे एकाच व्यक्तीमधून दोन अथवा त्याहून अधिक व्यक्तींच्या प्रकट होण्यासंबंधीच्या आजाराची लक्षणे निर्माण होऊ शकतात. अशा वेळी संमोहन अथवा अन्य तंत्रांद्वारे त्या व्यक्तीकडून दडपले गेलेले बालपणीचे आघात त्यांच्या जाणिवेच्या पातळीवर आणले जातात. एकूणच ही प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असते. त्यांची कोणतीही चूक नसताना कित्येक अश्राप बालकांना अशा दिव्यातून जावे लागते. त्यांचे बालपण कोमेजून जाते. त्यांच्या बालपणात घडलेल्या भीषण अघटनांचे पडसाद पुढील आयुष्यातही उमटत राहतात.लैंगिकतेसंदर्भातील जोक्स समाजमाध्यमातून अनेक ग्रुप्सवर फिरत असतात. हे जोक्स निरुपद्रवी असतील. त्यामुळे कोणाचीही मानसिक व शारीरिक हानी होणार नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू शकतो. पण, त्यातून उद्भवणाºया गंभीर प्रश्नांच्या परिणामाला आवर घालण्यासाठी कायद्याचा बडगा असायलाच पाहिजे. यालाच आपण मॉरल पोलिसिंग असा शिक्का मारला आहे. वस्तुत: हा प्रश्न केवळ नैतिक सदाचरणाचा नसून तो वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्याशी निगडित आहे. आमच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा अधिकार सरकारला आहे का, हे विचारणे मला तरी योग्य वाटत नाही. समाजहिताच्या आड येणारे खाजगीपण चव्हाट्यावर आणण्याच्या अधिकार नक्कीच सरकार आणि न्यायव्यवस्थेला आहे. आज एकूणच समाजातून नैतिकता हद्दपार होत चालली आहे. समाजातील नैतिक मानदंड व्यक्तीच्या आणि समाजाच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या रक्षणासाठी तयार झालेले संकेत आहेत. त्यांची गरज कालातीत आहे. त्यांच्या रक्षणाकरिता उचललेल्या पावलाबद्दल मॉरल पोलिसिंग म्हणून कांगावा करण्यात काय अर्थ आहे. आपले खाजगीपण जपताना दुसºयांच्या हक्कांची पायमल्ली होत असेल, तर त्यासाठी कायद्याच्या चौकटीतून शिक्षा झालीच पाहिजे. आज सर्वत्र चिरंतन अशा मूल्यांचा ºहास होताना दिसत आहे.स्वत:च्या स्वार्थासाठी मनमानी करणे, बेबंदपणे वागणे, या गोष्टींचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. त्यासाठी आज खºया अर्थाने समाजप्रबोधनाची गरज आहे. पूर्वी संतांनी आणि समाजसुधारकांनी हे कार्य केले. आजच्या काळात स्वयंसेवी संघटनांमार्फत हे काम होऊ शकते.(लेखिका मानसशास्त्रया विषयाच्या अध्यापिका आहेत.)(संकलन : मुरलीधर भवार)

टॅग्स :Socialसामाजिकnewsबातम्या