ठाणे : छत्रपती संभाजी महाराजांची जयंती, अक्षय्य तृतीया आणि रमजान ईद यानिमित्त ठाण्यात शुक्रवारी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ३४०हून अधिक दात्यांनी रक्तदान, तर ५० हून अधिक जणांनी प्लाझ्मादानसाठी नोंदणी केली.
ठाण्यातील एकूण १८ सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ठाण्यातील चरई मावळी मंडळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वेळात वेळ काढून आपले कर्तव्य बजावत, काहींनी कामावरून अर्धी सुटी घेऊन, रिक्षाचालक, सफाई कामगार, पोलीस अधिकारी, कर्मचारी, ठाणे महापालिकेचे कर्मचारी, स्थानिक नागरिक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, कोरोनातून बरे झालेले असे अनेक रक्तदाते उपस्थित होते. ठाण्यात प्रथमच १८ सामाजिक संस्था एकत्रित येऊन हे भव्य रक्तदान शिबिर घेतले. सध्या कोरोना महामारीत रक्ताचा तुडवडा जाणवत आहे. तो तुडवडा पूर्णपणे नाहीसा व्हावा व रुग्णांना कोणत्याही रक्तगटाची कमी पडू नये, वेळेत त्याला रक्त मिळावे या हेतूने हे शिबिर आयोजित केले होते. ज्यांना या रक्तदान शिबिरात येता आले नाही त्यांच्यासाठी झेप प्रतिष्ठान, स्मृती फाऊंडेशन व शंखेश्वर मित्रमंडळाने रविवारी कल्याण (पू.) येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
------------