शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

कोरोनापेक्षा इतर आजारांनी मृत पावलेले अधिक; कोरोनानं २,१३१ जणांचा मृत्यू, तर अन्य आजारांमुळे ३९,४७२ मृत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 1:07 PM

मागील अडीच वर्षे कोरोनामुळे हाहाकार माजला होता. कोरोनामुळे अनेकांचे प्राण हिरावले गेले. मात्र, ठाणे शहरात या कालावधीत कोरोनामुळे २ हजार १३१ जणांचा मृत्यू झाला.

ठाणे :

मागील अडीच वर्षे कोरोनामुळे हाहाकार माजला होता. कोरोनामुळे अनेकांचे प्राण हिरावले गेले. मात्र, ठाणे शहरात या कालावधीत कोरोनामुळे २ हजार १३१ जणांचा मृत्यू झाला. मात्र, त्याहीपेक्षा इतर आजारांनी याच कालावधीत ३९ हजार ४७२ जणांचा मृत्यू झाला. याच कालावधीत ५० हजार ४१० जणांचा जन्म झाल्याची माहिती आहे. 

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचे मृत्यू झाले. अनेकांचे संसार उदध्वस्त झाले. या महामारीच्या काळात ५० हजार ४१० मुलामुलींचा जन्म झाला. या कालावधीत तब्बल ४१ हजार ६०३ मृत्यूची नोंद असून यापैकी २,१३१ मृत्यू कोरोनामुळे झाले. २,०२३ बालकांचे मृत्यू झाले. या अडीच वर्षांच्या कालावधीत ८ हजार ८०८ जणांचा जीव वाचला.

नौपाडा-कोपरी विभागात ८ हजार ४०४ तर ठाण्यातील  कोलशेतमध्ये सर्वात कमी १२९ मृत्यू झाल्याची नोंद आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत पुरुषांच्या मृत्यूंचे प्रमाण हे २५ हजार ४०, तर स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे १७ हजार ९९ नोंदवण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जून ते सप्टेंबर या काळात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण हजारांहून अधिक होते. पहिल्या लाटेत पुरुष मृत्यू प्रमाण १० हजार ८१९, तर दुसऱ्या लाटेत ११ हजार २३ एवढे होते. याच कालावधीत कमी वजनाच्या, कमी दिवसांच्या बालकांचे मृत्यू झाले. 

दोन हजार २३ बालकांचा झाला मृत्यू जुळी गर्भधारणा, मातेला संसर्ग, पोषण आहाराची कमतरता, जन्मत: व्यंग यामुळे  बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात  ९७२ बालकांचा मृत्यू ओढवला. २०२१ मध्ये ७३० आणि जानेवारी ते मे २०२२ या पाच महिन्यांत ३२१ अशा जवळपास २ हजार २३ बालकांचा मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे