ठाणे - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर कल्याणच्या दिशेकडील नवीन पादचारी पुलाचा तसेच ठाणे पूर्वेस चढणा-या व उतरणा-या अशा दोन्ही सरकत्या जिन्यांचा लोकार्पण सोहळा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. याचदरम्यान, ठाणे ते वाशी-पनवेल या वाढीव फेºयांचा शुभारंभ केला असून या फेºया येत्या ३० जानेवारीपासून सुरू होणार आहेत. याप्रसंगी ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, सुरेश व्ही. नायर, स्टेशनमास्तर एस.बी. महिदर आदी उपस्थित होते.ठाणे रेल्वे स्थानकातून सुटणा-या गाड्यालोकल वेळठाणे ते पनवेल सकाळी ९:१४ठाणे ते नेरूळ दुपारी ३ : ०५ठाणे ते वाशी दुपारी ३ : ५२ठाणे ते पनवेल सायंकाळी ६ : १०ठाणे ते नेरूळ दुपारी ५ : १६ठाणे ते वाशी दुपारी ४ : १९ठाणे ते पनवेल रात्री ९ : ३६ठाणे ते नेरूळ रात्री ८ : २०नेरूळ ते ठाणे रात्री ८ : ५८पनवेल-नेरूळ-वाशी रेल्वे स्थानकांतून सुटणा-या गाड्यालोकल वेळपनवेल ते ठाणे सकाळी ८ : १५नेरूळ ते ठाणे दुपारी ३ : ४५वाशी ते ठाणे दुपारी ३ : ११पनवेल ते ठाणे सकाळी १० : १२नेरूळ ते ठाणे दुपारी ५ : ५४वाशी ते ठाणे दुपारी ४ : ३१पनवेल ते ठाणे सायंकाळी ७ : १८ट्रान्स हार्बर मार्गावरील या अतिरिक्त १६ फेºयांमुळे प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे.तसेच सरकत्या जिन्यांचा लाभ ज्येष्ठांना आरम मिळण्यास मदत होणार आहे.-खा. राजन विचारे
मंगळवारपासून धावणार जादा लोकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 6:23 AM