ठाणे : बेस्ट मधील कंत्राटी कामगारांनी ज्या पध्दतीने संपाचे हत्यार उपसले होते. त्याच धर्तीवर आता ठाणे परिवहन सेवेच्या धर्मवारी आनंद दिघे आगारात कार्यरत असलेले कंत्राटी पुरुष व महिला वाहक हे येत्या २१ ऑगस्ट पासून बेमुदात संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. पगारवाढी बरोबरच इतर मागण्या मान्य कराव्यात यासाठी हे हत्यार उपसण्यात आले आहे. त्यामुळे आता ठाणेकर प्रवाशांना देखील त्याचा फटका सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.
ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी कर्मचाºयांनी यापूर्वी देखील संपाचे हत्यार उपसले होते. त्यानंतर आता बेस्ट मधील कंत्राटी कर्मचाºयांनी ज्या पध्दतीने काही दिवसांपूर्वी विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार पुकारले होते. त्याच धर्तीवर आता ठाणे परिवहन सेवेचे कंत्राटी वाहक देखील आक्रमक झाले आहेत. त्यानुसार महिला १२० आणि पुरुष २८० असे ४०० हून अधिक वाहक या बेमुदत संपात सहभागी होणार आहेत. परंतु ते संपात सहभागी झाले तर त्यांना सहकार्य करण्यासाठी कदाचित चालक देखील सहभागी होऊ शकतात अशी भिती परिवहन सेवेला आहे. त्यामुळे त्याचा फटका परिवहनच्या प्रवाशांना बसू नये यासाठी परिवहनने पावले उचलली आहेत.
तिकडे जीसीसी तत्वावर कार्यरत असलेल्या आनंद नगर डेपोमध्ये देखील या संपाची झळ बसू शकते. त्यामुळे जे वाहक, चालक संपात सहभागी होतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा येथील ठेकेदाराने केला आहे. तसेच प्रवाशांना फटका बसू नये यासाठी परिवहनमधील कायम स्वरुपी सेवेत असलेले वाहक या काळात उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. किंवा परिवहनच्या पहिल्या स्थानकावर आणि शेवटच्या स्थानकावर तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करुन द्यावी जेणेकरुन प्रवाशांचे हाल होणार नाहीत.
दरम्यान परिवहन प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी कायम स्वरुपी सेवेत असलेल्या कर्मचाºयांना विशेष सुचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार संप संपुष्टात येत नाही तोपर्यंत साप्ताहीक सुट्या व इतर सर्व प्रकारच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या कर्मचाºयांच्या आगाऊ रजा मंजुर असतील अशा कर्मचाºयांनी रजा न घेता नियोजीत, विनासंमती कर्तव्यावर हजर राहावे, कोणीही कर्मचाºयांनी विनापरवानगी, विनासंमती कर्तव्यावर गैरहजर राहतील अशा कर्मचाºयांच्या रजा मंजुर केल्या जाणार नाहीत. तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा एका पत्रकाद्वारे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिला आहे.