सुरेश लोखंडे , ठाणे‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ग्रामीण भागात शौचालये बांधून गावपाडे हगणदारीमुक्त करण्याची योजना राज्य शासन जिल्हा परिषदांच्या माध्यमातून राबवत आहे. यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसतानाही ठाणे जिल्हा परिषदेने राज्यातील अन्य जिल्हा परिषदांच्या तुलनेत सर्वाधिक २१ हजार ७३४ शौचालये बांधली आहेत. राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या या जिल्हा परिषदेचे राज्याचे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी बुधवारी मंत्रालयात आढावा बैठकीत कौतुक केले.या मिशनच्या माध्यमातून गावपाडे, खेडे येथे स्वच्छताविषयक जनजागृती करून जास्तीतजास्त वैयक्तिक शौचालये बांधण्याचे नियोजन केले आहे. पण, त्यासाठी निधीची फारशी तरतूद नसल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांना शौचालये बांधणे फारसे शक्य झाले नाही.
राज्यात सर्वाधिक शौचालये ठाण्यात
By admin | Published: July 11, 2015 3:31 AM