शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
3
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
4
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
5
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
6
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
7
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
8
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
9
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
10
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
11
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
12
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
13
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
14
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
15
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
16
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
17
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
18
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
20
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

तुझ्याविना गं आई मला मुळीच करमत नाही…; अनाथाश्रमात सोडलेल्या लहानग्याने संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 9:13 AM

आईच्या विरहाने व्याकूळ ७ वर्षे १० महिने वयाच्या चिमुरड्याने विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : वडील वारल्यानंतर आईने दुसऱ्याशी घरोबा केला असता, दोन मुलांना अनाथाश्रमात ठेवले होते, परंतु आईच्या विरहाने व्याकूळ ७ वर्षे १० महिने वयाच्या चिमुरड्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. 

नालासोपारा येथील अब्दुल सय्यद याच्याशी प्रीती हिने लग्न केले होते. लग्नानंतर तिचे नाव फरिदा झाले. अब्दुलपासून तिला चार मुले झाली, परंतु अब्दुल सय्यद याच्या मृत्यूनंतर २९ वर्षांच्या फरिदासमोर मुलांच्या पालनपोषणाचा  प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तिने दुसऱ्याशी घरोबा केला.  दुसऱ्यासोबत घरोबा केल्यानंतर तिने २६ जूनला  तिच्या ७ वर्षे ७ महिन्याच्या अरमान व ११ वर्षांचा रेहान यांना भाईंदरच्या उत्तन-पाली येथील सेवा कुटीर या अनाथाश्रमात ठेवले. दीड वर्षाचे आणि ४ वर्षे वयाची तिची दोन मुले फरिदा हिने स्वतःसोबत ठेवली. 

आईजवळ राहण्याचा हट्ट

फरिदा हिने २६ जून रोजी अरमानला आश्रमात ठेवले तेव्हा तो खूप रडला होता. फरिदा तीन वेळा आश्रमात मुलांना भेटायला गेली. अरमान तुझ्यासोबत राहायचे आहे, असा हट्ट धरून रडत असे. आश्रमात २१ मुले आहेत. ८ ऑक्टोबरला सकाळी अरमान न दिसल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. परिसरातील विहिरीत अरमानचा मृतदेह आढळला. भाईंदर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादाराम करांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. उत्तन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून स.पो.नि. सपन बिश्वास तपास करत आहेत. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर