शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
2
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
3
Share Market Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात जोरदार खरेदी; Sensex-Nifty मध्ये तुफान तेजी
4
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
5
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
6
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
7
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
8
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
10
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
11
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
12
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
13
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान
15
ऐकावं ते नवलंच! हेमंत सोरेन यांचे वय 5 वर्षात 7 वर्षांनी वाढले, भाजपने साधला निशणा...
16
भाजपची 'चाणक्य नीती'? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!
17
ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी! पक्ष संघटनेच्या विरोधात काम करीत असल्याने कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
19
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
20
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट

‘गदर’वरून सासूला केले फ्रॅक्चर, सुनेने जाब विचारत दिले ढकलून; तक्रारीनंतर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 12:23 PM

Crime News: मालमत्तेवरून वाद घालणारी सून ‘गदर’ चित्रपट बघायला न्या, असे सांगत पतीला मारण्यास गेली असता सासूने अडवले म्हणून तिला ढकलून पाडले. त्यात सासूच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी पोलिसांनी सुनेवर गुन्हा दाखल केला आहे. 

मीरा रोड : मालमत्तेवरून वाद घालणारी सून ‘गदर’ चित्रपट बघायला न्या, असे सांगत पतीला मारण्यास गेली असता सासूने अडवले म्हणून तिला ढकलून पाडले. त्यात सासूच्या खांद्याला फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी पोलिसांनी सुनेवर गुन्हा दाखल केला आहे. 

भाईंदर पूर्व, एनपी पार्कच्या स्वस्तिक इमारतीत ६३ वर्षांच्या माया गोयल या पती राजेंद्रप्रसाद (६६),  मुलगा अमन आणि सून दीक्षा (२७) असे कुटुंब राहते. राजेंद्रप्रसाद यांचे नवघर मार्गावर हार्डवेअरचे दुकान आहे तर अमन हा इमारत दुरुस्तीचे काम करतो, असे फिर्यादीत म्हटलेय. 

दीक्षा आणि अमन यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली असून सासू-सासऱ्यांच्या घर, दुकान या मालमत्तेवरून गेल्या वर्षभरापासून दीक्षा वाद घालत आहे. माया आणि राजेंद्रप्रसाद हे ‘गदर’ चित्रपट पाहून रात्री घरी आले. तेव्हा दीक्षा हिने तुम्ही कोणाला विचारून चित्रपट बघायला गेलात, असा जाब सासूला विचारला. मला आताच्या आता चित्रपट बघायला घेऊन चला, असे तिने पतीला सांगितले. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची, भांडण सुरू झाले. 

संतप्त दीक्षा हिने घरातील प्लास्टिकचे टेबल उचलून पतीला मारण्यास गेली असता सासूने तिला रोखले. यावेळी तिने सासूला जोराने ढकलून पाडले आणि शिवीगाळ सुरू केली. त्यात सासू माया यांचा खांदा फ्रॅक्चर झाला. याप्रकरणी माया यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी