ठाणे - कसारा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पेठ्याचा पाडा येथील दोन 16 वर्षीय मुली मंगळवारपासून बेपत्ता होत्या. दुर्दैवाने आज दोन्ही मुलींचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत जंगलात सापडला. या दोन्ही मुलींनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
मंगळवार दि 9/6/21 रोजी मयत मुलीं पैकी मनीषा दादू धापटे या मुलीं च्या आई ने सकाळी शेतावर जात असतांना तु घरीच थांब दुपार चे जेवण तयार करून ठेव असे मनीषाला सांगितले व मनीषाची आई, वडील शेतावर निघून गेले सर्व जण शेतावर निघून गेल्या नंतर मनीषा तिच्या शोभा वाळू धापटे या मैत्रिणी च्या घरी गेली व तिथे खेळत बसली दुपारी मनीषा ची आई शेतावरून घरी डब्बा घ्यायला आली असता मनीषाने घरात काहीही बनवले नसल्याचे लक्षात आले घरात मनीषा देखील नसल्याने ती मैत्रिणी कडें गेल्याचे समजले म्हणून मनीषाची आई शोभा धापटे हिच्या घरी गेली तिथे मनीषाला जेवण बनवले नाही म्हणून बडबड केली व पुन्हा शेतावर निघून गेली.
या दरम्यान आई मैत्रिणीच्या समोर ओरडली म्हणून रागात घरी गेली व दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडली त्या दरम्यान मनीषा च्या पाठोपाठ शोभा देखील घराबाहेर पडली. मंगळवारी दुपार पासून मनीषा व शोभा बेपत्ता झाल्या मंगळवारी संद्याकाळ पर्यंत मुलीं घरी न आल्याने दोन्ही कुटूंबातील लोकांनी व स्थानिक ग्रामस्थानी शोध सुरु केला नातेवाईक, इतर मैत्रिणी, सर्व कडे शोध घेतला तरी दोघी जणी आढळून आल्या नाही शेवटी आज स्थानिक ग्रामस्थ व धापटे कुटूंबातील लोकांनी उबरमाळी, फणसपाडा,लगत चे डोंगरा वर शोध सुरु केला असता तिथे एक जणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सकाळी 9 वाजता आढळून आला. त्याची माहिती तात्काळ पोलीस पाटील वाकचौरे यांना देऊन कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नाईक यांना कळवले.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक नाईक व कर्मचारी तात्काळ दाखल झाले. मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळी शवविच्छेदन करण्यासाठी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर सुचित्रा पाडवी व शहापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या ऐश्वर्या नायर यांना बोलवण्यात आले. मनीषा दादू धापटेचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी दुसरी मुलगीसुद्धा आसपास असू शकते असा अंदाज घेत शोध सुरु केला. त्यावेळी, 500 मीटरच्या अंतरावर शोभा वाळू धापटेचा मृतदेह दुपारी 4 वाजता कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.