कल्याण : भारत-चीन सीमेवर जवानांमध्ये चकमक झाल्याने तेथे तणावाचे वातावरण आहे. यासंदर्भात बातम्या पाहून लेह, लडाखच्या युद्धभूमीवर तैनात असलेल्या कल्याण येथील जवानाची आई धास्तावली. आपल्या मुलाचे काय होणार? या चिंतेने तिचा रविवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. तिच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या मृत्यूची बातमी मुलाला कळविली असून, तो घरी येण्यास निघाला आहे.पूर्वेतील कचोरे येथील श्रीकृष्णनगरात राहणाºया अफसाना शब्बीर पटेल (६८) यांचा मुलगा सोराब हा भारतीय सैन्यात आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्याची बदली लेह, लडाख परिसरातील भारताच्या सीमेवर झाली आहे. १६ जूनच्या रात्री चिनी सैन्याने भारतीय सीमेवर हल्ला केला. त्याबाबतच्या बातम्या टीव्हीवर सुरू झाल्या. भारत-चीन युद्धाची शक्यता त्यात वर्तविण्यात आली. त्यामुळे सोराबचे काय होणार? या भीतीने त्याची आई अफसाना या चिंतित झाल्या. त्या टेन्शनमुळे त्यांना रविवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा भाचा साजीद खान यांनी अफसाना यांना तातडीने खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथे बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत रुग्णालयाने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. या धावपळीत अफसाना यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.<आईचे अंत्यदर्शन मुकले : सीमेवर मुलाला आईच्या मृत्यूची बातमी कळविली आहे. तो मंगळवारी कल्याणला घरी पोहोचणार आहे. मात्र, आईचे अंत्यदर्शन त्याला घेता आलेले नाही.
सीमेवर लढणाऱ्या जवानाच्या आईचा धसक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 4:20 AM