शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

बाळाला पळवणारी महिलाच तीन मुलांची आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 5:00 AM

ठाण्याच्या शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाला पळवणाºया महिलेच्या ताब्यातून पोलिसांनी घेतलेल्या सहापैकी तीन मुले तिची स्वत:चीच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. उर्वरित तीन मुलांचा तपशील काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ठाणे : ठाण्याच्या शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाला पळवणाºया महिलेच्या ताब्यातून पोलिसांनी घेतलेल्या सहापैकी तीन मुले तिची स्वत:चीच असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. उर्वरित तीन मुलांचा तपशील काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.ठाण्याच्या शासकीय रुग्णालयातून १४ जानेवारी रोजी नवजात बाळाला एका महिलेने पळवले होते. गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकाने अतिशय तत्परतेने डोंबिवली येथील आरोपी महिला गुडिया राजभर, तिचा पती सोनू राजभर आणि शेजारी विजय श्रीवास्तव उर्फ कुबड्या यांना अटक करून नवजात बाळाला मातृछत्र मिळवून दिले. आरोपींच्या ताब्यात नवजात बाळाव्यतिरिक्त आणखी सहा मुले होती. ही मुले त्यांचीच आहेत अथवा नाही, हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या डीएनए चाचणीची प्रक्रिया सुरू केली आहे. तीन ते ११ वर्षे वयोगटातील ही मुले तूर्तास नवी मुंबई आणि नेरूळ येथील बालसुधारगृहात संगोपनासाठी ठेवली आहेत. सर्व मुले आपली स्वत:ची असल्याचा दावा आरोपी महिलेने पोलिसांजवळ केला आहे. स्वत:ची सहा मुले असताना नवजात बाळ चोरण्याचे कारण काय, या मुद्द्यावर पोलिसांनी विचारणा केली असता, महिलेने वेगवेगळी उत्तरे दिली. तिच्या ताब्यातून घेतलेल्या सहा मुलांमध्ये पाच मुली आणि एक मुलगा आहे. म्हातारपणी आधारासाठी आणखी एक मुलगा असावा, यासाठी आपण रुग्णालयातून बाळ चोरले होते, असे या महिलेने पोलिसांजवळ सांगितले. महिलेसोबत अटक केलेला तिचा शेजारी विजय श्रीवास्तव याला मूलबाळ नाही. त्याला आधार मिळावा, यासाठी बाळ चोरल्याची विरोधाभासी माहितीही महिलेने पोलिसांना दिली. तिच्या ताब्यातील सहा मुलांचे तथ्य तपासण्यासाठी पोलिसांनी डीएनए चाचणीची प्रक्रिया सुरू केली असली, तरी दुसरीकडे महिलेचे शेजारी आणि नातलगांकडेही चौकशी सुरू आहे.सर्व मुले आरोपी दाम्पत्याचीच असावीत, असे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी महिलेचा शेजारी विजय श्रीवास्तव उर्फ कुबड्या याच्याविरुद्ध दादर आणि मुंबईतील सीएसटी परिसरात अशा प्रकारचे काही गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहितीही मिळाली आहे. ती पडताळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.