ठाणे : कळवा येथील पारसिकनगरमधील वास्तुआनंद सोसायटीतील शिक्षिका ज्योती नितीन बोरसे (३६) यांचे प्रसूतीनंतर अवघ्या तीन दिवसांनी मुंबईच्या केईएम रुग्णालयात गुरुवारी निधन झाले. त्यांनी मुलगा व मुलगी या दोन बाळांना जन्म दिला. ते दोन्ही या रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीत आहेत. ठाणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी के.आर. बोरसे यांच्या त्या सून आहेत.येथील मानपाडा परिसरातील संकेत विद्यामंदिरच्या माध्यमिक विभागात भूगोल विषयाच्या त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळगावी नाशिक येथे शुक्रवारी करण्यात आला. त्यांच्या पश्चात सासू, सासरे, पती, दोन दीर आणि नणंद आहे. निधनामुळे त्यांच्या वास्तुआनंद सोसायटीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या या दोन्ही बालकांची प्रकृती उत्तम असून त्यांना केईएममधून शनिवारी नाशिकच्या नेल्सन रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे त्यांचे सासरे के.आर. बोरसे व स्रेही गणेश लाखोडे यांनी सांगितले.
प्रसूतीदरम्यान मातेचा मृत्यू, दोन बालके डॉक्टरांच्या निगराणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 4:28 AM