ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालयात एकीकडे उत्साहात स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येत असताना, दुसरीकडे याच रूग्णालयात बालकांना उपचारासाठी घेऊन येणाऱ्या मातांना हिरकणी कक्षाची कोणीही माहिती देत नसल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ अथवा प्रसूती कक्षाबाहेर आपल्या बाळांना दूध पाजण्याची वेळ ओढवल्याचे चित्र नेहमीच पाहण्यास मिळते.
ठाणे जिल्ह्यातील एसटीस्थानक, बाजार समिती केंद्र, रेल्वेस्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी स्तनदा मातांना बाळाला दूध पाजण्यासाठी जागाच नसते. यावर उपाययोजना म्हणून हिरकणी कक्षाची उभारणी केली. या कक्षांमध्ये मातांना बसण्यासाठी बेड, पंखा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवण्यात आली. तर, जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या २२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कक्ष स्थापन केले आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयातदेखील हिरकणी कक्ष दिमाखात सुरू केला. तो जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्त्रीरोग, बाह्यरु ग्ण विभागाच्या शेजारी सुरू केला असून या विभागात उपचारासाठी येणाºया मातांनी विचारपूस केल्यानंतर त्यांना या विभागाची माहिती देण्यात येत असते. त्यात हिरकणी कक्ष हा मुख्य इमारतीच्या तळमजल्यावरील प्रसूती कक्षाजवळ असणे आवश्यक होते. असे असतानादेखील या ठिकाणी हा विभाग कुठे सुरू केला आहे, याची माहितीच प्रसूती कक्षात येणाºया मातांना मिळत नसल्यामुळे प्रसूती कक्षाबाहेर जिन्याखाली, इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक माता आपल्या बाळांना दूध पाजताना दिसत असतात.ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालयात दरवर्षी मोठ्या उत्साहात स्तनपान सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहादरम्यान गरोदर मातांना स्तनपानाचे महत्त्व व त्याचे फायदे यांची माहिती दिली जाते. तसेच मातांना आहाराविषयी माहिती व जनजागृती करणाºया जिल्हा सामान्य रु ग्णालय प्रशासनाला हिरकणी कक्षाची माहिती फलक लावण्याचा विसर पडल्याचे दिसते. विशेष म्हणजे या मुख्य इमारतीत तळ मजल्यावर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांचे कार्यालय, तर पहिल्या मजल्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांचे कार्यालय आहे. याठिकाणी डॉक्टरांसह नर्स व अन्य रु ग्णालय कर्मचाऱ्यांचा वावर कायमस्वरूपी असतो. मात्र, अशा सार्वजनिक ठिकाणी मातांना हिरकणी कक्षाबाबत माहिती मिळत नसल्याचे दिसते.जिल्हा सामान्य रु ग्णालयात हिरकणी कक्ष सुरू केलेला आहे. मात्र, रु ग्णालयात येणाºया मातांना या कक्षाबाबत माहिती व्हावी, यासाठी रु ग्णालयाच्या आवारात फलक लावण्यात येतील.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे