शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

मुलाच्या आग्रहाने मातेने जिंकली तीन पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 3:22 AM

मलेशिया येथील कवॉलाल्मपूर येथे पार पडलेल्या ३२ व्या मलेशियन इंटरनॅशनल ओपन मास्टर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलातील दोन महिलांनी तिरंगा फडकावला.

ठाणे : मलेशिया येथील कवॉलाल्मपूर येथे पार पडलेल्या ३२ व्या मलेशियन इंटरनॅशनल ओपन मास्टर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलातील दोन महिलांनी तिरंगा फडकावला. तसेच या दोन सुवर्णपदकांसह एकूण चार पदके जिंकली आहेत. श्रुतिका महाडिक यांनी आपल्या मुलाच्या आग्रहास्तव आंतरराष्टÑीय स्पर्धेत सहभागी होऊन वेगवेगळी तीन पदके जिंकल्याचे ठाण्यात शुक्रवारी झालेल्या एका परिषदेत त्यांनी सांगितले.राज्य गुप्तवार्ता विभागात सहायक गुप्तवार्ता अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महाडिक या राष्ट्रीयस्तरावरच्या ज्युदोपटू आहेत. तसेच २००२ मध्ये त्यांनी कांस्यपदक मिळवले होते. मात्र, २००८ पासून त्यांनी खेळाला रामराम ठोकला होता. पतीच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पोलीस दलातील नोकरी सांभाळून आपल्या मुलाच्या संगोपनाकडे लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे त्यांचे खेळाशी नाते तुटले होते. याचदरम्यान आठ वर्षांचा मुलगा अमोघ याला त्यांनी मलेशियन इंटरनॅशनल ओपन मास्टर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेबाबत माहिती दिली. वयाची तिशी ओलांडलेले खेळाडूच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. त्यावेळी त्याने आपल्या आईला म्हणजेच श्रुतिका यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आग्रह धरला. त्याच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या वरिष्ठांची परवानगी घेऊन सदर स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, या स्पर्धेत त्यातील उंचउडी प्रकारात सुवर्ण, १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य आणि तिहेरी उडी प्रकारात कांस्यपदक मिळवले. तर, पायाला दुखापत झाल्याने त्यांना जलद चालण्याच्या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. त्यामुळे ते एक पदक हुकले. मात्र, त्या स्पर्धेतील क्रीडा प्रकारात ठाणेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुनीता औसेकर-दिगुले यांनी सहभागी होऊन सुवर्णपदक जिंकले.