आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बाप्पाही हायटेक होत चालले आहेत. आजपर्यंतच्या झुलत्या देखाव्यांची प्रथा आता मोडीत निघाली आहे. पुण्यामध्ये बाप्पाचा प्रसाद एटीएम मशिनमधून बाहेर येत होता. तर वसईतल्या एका मुलीने प्रसाद वाटणारा, पर्यावरणाची माहिती सांगण्याबरोबरच भक्तांसोबत सेल्फी काढणारा मूषक बनविला आहे.
सायली प्रभू असे या मुलीचे नाव आहे. तिने यंदा प्लॅस्टिक, थर्माकोल बंदी असल्याने चक्क बाप्पाचे वाहन असलेल्या उंदराचा रोबो बनविण्याचा निर्णय घेतला. या उंदराद्वारे पर्यावरणाबाबत जनजागृती, स्वच्छता, कचरामुक्ती, पुनर्वापर आणि सोशल मिडियाची अतिशोयक्ती यावर जागृती केली आहे. या उंदीरमामाला पाहण्यासाठी अबालवृद्ध गर्दी करत आहेत.
कसा तयार झाला उंदीरमामा...
उंदीरमामा बनविण्यासाठी सायली आणि तिच्या बहिणीने कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केला. तसेच टाकाऊ कागद, कार्डबोर्ड यांचा वापर करून त्यांनी उंदीरमामा बनविला. गणेशभक्तांना हा उंदीर प्रसाद देतो. तसेच त्यांच्या सोबत प्रसादही देतो.