भिवंडी: मुलीच्या बारशाच्या खरेदीसाठी गेलेल्या युवकाचा रस्त्यावरील खड्डयात पडून मृत्यू झाला असुन गुरूवारी सायंकाळी ग्रामस्थांनी मृतदेह घटनास्थळी रस्त्यावर ठेऊन रस्त्या ठेकेदारा विरोधात संताप व्यक्त करीत आंदोलन छेडले.गणेश शांताराम पाटील(३५)असे मृत युवकाचे नाव असून तो आपल्या मुलीच्या बारशाचे सामान आणण्यासाठी गेला होता.घरी परत जात असताना भिवंडी वाडा मार्गावरील धोंडा वडवली येथे रस्त्यात असलेल्या खड्ड्यात त्याची दुचाकी पडली आणि गणेश पाटील रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला.त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो कोमात गेला. त्यास ठाण्यातील खाजगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा आज गुरूवारी सकाळी मृत्यू झाला.या घटनेने परिसरांतील ग्रामस्थ आणि मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत आज सायंकाळी त्याचा मृतदेह रस्त्यावर ठेवीत धोंडावडवली येथे घटनास्थळी आंदोलन केले. बाळकुम-भिवंडी-वाडा-मनोर हा महामार्ग गेल्या पाच वर्षापासून बीओटी तत्वावर सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या ठेकेदारास दिले आहे. या मार्गावरील रस्ते व खड्डे दुरूस्त न करता राजरोसपणे टोल वसुली केली जात आहे.या मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यामुळे अपघात होऊन अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी देखील रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे.काही दिवसंपुर्वी वाडा तालुक्यातील मौजे काटी येथील प्रभाकर पाटील या दुचाकी स्वाराचा पाहूणीपाडा येथे रस्त्यातील खड्ड्यात पडून मृत्यू झाला. त्यामुळे ३ आॅक्टोंबर रोजी वाडा येथे शिवसेनेतर्फेरोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मध्यस्थीने ठेकेदाराने रस्त्यातील खड्डे भरण्याचे आश्वासन दिले. मात्र ठेकेदाराने हे काम पुर्ण केले नाही. त्यामुळे तालुक्यातील धोंडावडवली येथे ही घटना घडली. अपघातानंतर गणेश पाटील यास ठाण्यातील रूग्णालयांत उपचार सुरू होते. आज गुरूवारी त्याचा मृत्यू झाल्यानंतर परिसरांतील ग्रामस्थ व मृताच्या नातेवाईकांनी गर्दी करीत धोंडावडवली येथील घटनास्थळी संताप व्यक्त करीत आांदोलन छेडले. तसेच सायंकाळी गणेशचा मृतदेह घटनास्थळी ठेऊन सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी विरोधात संताप व्यक्त केला आणि संबधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. तसेच मृतांच्या वारसाला ३० लाखाची आर्थिक मदत करावी आणि मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनीने स्विकारावी,अशी मागणी केली. सुमारे पाऊणतास हे आंदोलन सुरू होते. सुप्रिम कंपनीच्या वतीने आर्थिक मदतीबाबत लेखी आश्वासन दिले. तसेच सुप्रिम कंपनी व संबधित शासकीय अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन गणेशपुरी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेहावर अंत्यविधी केला. या घटनेकडे आज सकाळपासून तालुक्यातील ग्रास्थांचे लक्ष लागले होते.
भिवंडीत रस्त्यातील खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू घटनास्थळी मृतदेह ठेऊन आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 8:06 PM
भिवंडी : मुलीच्या बारशाच्या खरेदीसाठी गेलेल्या युवकाचा रस्त्यावरील खड्डयात पडून मृत्यू झाला असुन गुरूवारी सायंकाळी ग्रामस्थांनी मृतदेह घटनास्थळी रस्त्यावर ...
ठळक मुद्देभिवंडी-वाडा मार्गावरील धोंडा वडवली येथे दुचाकी अपघातमृतदेह रस्त्यावर ठेऊन रस्त्या ठेकेदारा विरोधात आंदोलनरस्ता ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यां विरोधात होणार मनुष्यवधाचा गुन्हा