ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराडा नुकताच खाली बसतला आहे. त्यात आता पुन्हा जिल्ह्यातील नवी मुंबई परिसरातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व शहापूरच्या ९० ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी शुक्रवारी प्रारूप मतदारयादीदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नवी मुंबईतून वगळलेल्या १४ गावांच्या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वात्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत. या ग्रामपंचायतींचा समावेश कल्याण तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये समावेश आहे. मात्र, त्या ठाणे तालुक्यात समाविष्ट आहेत. कल्याण पंचायत समिती व कल्याण जिल्हा परिषद गटात या १८ गावांच्या पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. महसूल कार्यक्षेत्र म्हणून ही गावे व ग्रामपंचायती ठाणे तालुक्यात समाविष्ट आहेत. त्यांच्या या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. याशिवाय शहापूर तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्यादेखील पोट निवडणुका यावेळी हाती घेण्यात येत आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने प्रारूप मतदार यादीदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता जिल्ह्यातील गावपाड्यांमध्ये पुन्हा निवडणुकीचे वारे वाहणार असल्यामुळे स्थानिक ताणतणावाची शक्यताही दिसून येत आहे.
येथे होणार निवडणुकायामध्ये ठाणे तालुक्यातील पिंपरी, नागांव, वाकळण, दहिसर, दहिवली या पाच ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक म्हणजेच सार्वत्रिक निवडणुका हाती घेतल्या जात आहेत. तर उर्वरित ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.