सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील ६५ वर्षीय आईसह ३५ वर्षाची मुलगी ऑक्सिजन व औषध विना घरी असल्याची भावनिक पोस्ट सोशल मीडियावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी वाचली. खासदारांनी अर्धातासात शिवसैनिकांना पाठवून ऑक्सिजन व औषध देऊन खर्चाचे आश्वासन दिल्याने, मायलेकींना जीवदान मिळाले. याप्रकाराने खासदारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं -४ परिसरात ६५ वर्षीय निशा परमानंद पंजाबी यांना वृद्धत्व व तब्येतीमुळे बेडवरून उठता येत नाही. तर ३५ वर्षीय वृद्धेची मुलगी आरती परमानंद पंजाबी हिच्या हृदयाला हॉल असल्याने ऑक्सिजनची गरज आहे. घरात कोणीच नसल्याने त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. एका सतर्क नागरिकाने दोघी मायलेकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांच्यासाठी मदतीची याचना केली. सदर व्हायरल झालेली पोस्ट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाचण्यात आल्यावर, त्यांनी शिवसेनेचे उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान यांच्याशी संपर्क साधला. तसेच मुलींसाठी शिवसेनेचा ऑक्सिजन बॉटला व मायलेकींना औषधसह इतर साहित्य देण्याचे आदेश दिले. अर्ध्या तासात शिवसैनिक राहुल इंगळे यांच्यासह अन्य जण वृद्धेच्या घरी जाऊन मुलीला ऑक्सिजन बॉटला देऊन औषध दिले. तसेच जीवनावश्यक साहित्य दिले.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तत्परता व शिवसेना उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान यांच्या प्रयत्नमुळे मायलेकींना आधार मिळून नवीन जीवदान मिळाले. दोघीही मायलेकीच्या तब्येतीकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची सूचना खासदार शिंदे यांनी शहर पदाधिकारी व शिवसैनिकांना दिल्या. खासदार यांच्या तत्परतेचे शहरात कौतुक होत आहे. अशीच तत्परता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दाखवून समाजाचे पांग फेळावे. अशी सूचना शिवसेना उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान यांनी केली. तर खासदारांच्या मदतीमुळे अनेकांनी मदतीचा हात पुढे केल्याची माहिती समाजसेवक शशिकांत दायमा यांनी दिली.