सर्कस मैदान येथे नाट्यगृह उभारणे, कानसई येथिल आरक्षण क्र.११२ येथे अत्याधुनिक रुग्णालय उभारणे, अंबरनाथ पूर्व ग्रीन सिटीच्या आवारात तरण तलाव बांधणे, अंबरनाथ पश्चिम भागातील नेताजी मार्केट येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना, अंबरनाथ पश्चिम वुलन चाळ येथे रात्र निवारा केंद्र बांधणे, कानसई येथील नेहरू गार्डन सुशोभिकरण करणे, अग्निशमन केंद्र उभारणे, अंबरनाथ नगर परिषदेचे नवीन प्रशासकीय भवन उभारणे, शिवमंदिर परिसर सुशोभिकरण करणे या कामांची माहिती शिंदे यांनी घेतली. या कामांमध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. या बैठकीस मुख्य अधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगरसेवक सुनील चौधरी, सुभाष साळुंके, शशांक गायकवाड आदी उपस्थित होते.
----------------------