पंकज रोडेकर/कुमार बडदे, मुंब्राइसिसमध्ये तरूणांची भरती करण्यासाठी भारतातील प्रमुख म्हणून काम करत असल्याचा आरोप असलेला मुंब्य्रातील मुदब्बीर शेख (३५) याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक करताच मुंब्रा पुन्हा जगाच्या नकाशा आले. तरूणांची भरती करताकरता तोही परदेशी जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती मुंब्रा परिसराला भेट दिल्यावर हाती आली. कल्याणचे चार तरूण इसिसमध्ये भरती होण्यासाठी गेल्यानंतर मुंब्रा परिसरातूनही अनेक तरूण-तरूणी इसिसमध्ये दाखल होण्यासाठी गेल्याचा संशय व्यक्त होत होता, त्याला दुजोरा मिळाला. आयटीमध्ये क्षेत्रात प्रोग्रामिंगचे काम करताकरता तो घरातच राहून काम करीत असे. घर ते मशीद आणि मशीद ते घर एवढ्यापुरताच घराबाहेर पडणाऱ्या, फारशा कोणात न मिसळणाऱ्या मुदब्बीरला ताब्यात घेतल्याचे समजताच आसपास राहणाऱ्यांना धक्का बसला. अटकेनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी घराकडे धाव घेतल्यानंतर कुटुंबीय प्रसारमाध्यमांशी बोलण्यास तयार झाले. त्याला का अटक केली याची माहिती नसल्याचे सांगत, त्याला मुंबईत नेल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. विवाह सहा वर्षांपूर्वी मुंब्य्रातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या परिसरातील रेश्मा अपार्टमेंटमध्ये त्याच्या नावावर ४०४ नंबरचा फ्लॅट आहे. तो वन रूम किचनचा आहे. गेली चार वर्षे तो याच फ्लॅटमध्ये पत्नी उज्मा आणि मुलगी नायफा, इनाफ या पाच वर्षांंच्या आणि पाच महिन्यांच्या मुलींसोबत राहतो. सहा वर्षांपूर्वी त्याचा उज्मा हिच्याशी निकाह झाला आहे.परदेशी नोकरीच्या शोधात वाणिज्य शाखेतून पदवीधर होताच मुदब्बीरने आयटी प्रोग्रॉमिंगमध्ये करियर करण्यास सुरुवात केली. तो घरीच राहून काम करीत असे. सध्या तो परदेशात नोकरीच्या शोधात होता. त्यासाठी नालासोपाऱ्यात असतानाच त्याने आपला पासपोर्ट तयार केला होता. मुंब्य्रात आल्यावर त्याच्या पासपोर्टचे नुतनीकरण झाले. पत्नी उज्मा हिचा पासपोर्ट तयार केल्यावर महिन्यापूर्वी त्याने मुलींचे पासपोर्ट तयार करण्यासाठी अर्ज केला होता.घर ते मशीद मुदब्बीर हा घर आणि मशीद, तसेच मशीद ते घर एवढ्यापुरताच घराबाहेर पडत असे. तो कॉम्प्युटरवर काम करीत असे. वडिलांशी पटत नसल्याने त्याने मुंब्य्रात स्वत:चे घर घेतले. तेथे तो कुटुंंबासह राहत होता.-अहमद मियाँ, सासरेत्याचा फोन साधाचमुदब्बीर हा दिवसवर कॉम्प्युटरवर काम करीत असे. त्याबद्दल मला फारशी माहिती नसल्याने तो काय करीत असे, हे सांगणे कठीण आहे. त्याच्याकडे स्मार्ट फोन नव्हता, तर साधा मोबाईल होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याला मुंबईत नेत असल्याचे सांगितले.-उज्मा, मुदब्बीरची पत्नी
मुदब्बीर जाणार होता परदेशी?
By admin | Published: January 23, 2016 2:52 AM