ठाणे : हिंदी भाषीय कवी विदेह महाराज,न.ब.सिंह,त्रिलोचनसिंग अरोरा,उमेश मिश्रा, उमाकांत वर्मा, लक्ष्मण दुबे आणि कवित्री शिल्पा सोनटक्के यांनी हिंदी व मराठी भाषेत तर उर्दूचे कवि शमीम अब्बास,इरफान जाफरी,एजाज़ हिंदी,उबेद आज़मी,डॉ.वफा सुल्तानपुरी,नश्तर मालिकी,जावेद नदीम यांनी उर्दू भाषेत आपआपल्या मधूर रचना सादर केल्या. सूत्र संचालक युसूफ दिवान यांनी कविता,गज़लसाठी अमीर खुस्रू,गालिब,इकबाल,प्रेमचंद आणि इतर शायरांचे योगदान याची छान माहीती दिली निमित्त होते ते बहुभाषिय कवी संमेलनचे.
गज़ल आणि कविता प्रेमींनी भरलेल्या सभागृहात उपस्थित अनेक श्रोते यांनी या प्रकारचे बहुभाषीय कवी संम्मेलन ठाणे शहरात पुन्हा पुन्हा व्हावे अशी आयोजकांना विनंती केली. या संमेलनात अतिथी म्हणून शिवसेनेचे अनंत तरे, असदुल्लाह खान, ऍड. बि.एल.सिंह उपस्थित होते. कवी न. ब. सिंह नादान यांनी सम्मलेनाची सुरुवात केली.
*एकता फिर हमारी चाहिए ,
एकता फिर हमारी चाहिए.*
*दूर होंगी दिलों से नफ़रतें, दूर होंगी दिलों से नफ़रतें
मोहब्बत की खुमारी चाहिए, मोहब्बत की खुमारी चाहिए*
कवी उमेश मिश्रा यांनी शांति , प्रगती , मुक्ति शीर्षक कविता सादर केल्या. 'भरी महफ़िल मैं मैं सबके दिलों को जोड़ जाऊंगा, भरी महफ़िल मैं मैं सबके दिलों को जोड़ जाऊंगा, के तन्हाई के मंजर मैं मिलन का मोड़ लाऊंगा, शांति प्रगति मुक्ति से सजी इस काव्य महफ़िल मैं, सजे सब ख्वाब मैं अपने सपने छोड़ जाऊंगा, सजे सब ख्वाब मैं अपने सपने छोड़ जाऊंगा'. 26/11 च्या पार्श्वभूमीवर उमेश मिश्रा यांनी खालील कविता सादर केली. “सनी हो खून से माती तो हम चुप रह नहीं सकते
जो हो खतरे मैं चौपाटी तो हम चुप रह नहीं सकते.
आतंकी भेदियों का जब कहर बरसे हिमालय पर
जले कश्मीर की घाटी तो हम चुप रह नहीं सकते”...
या कवितेनंतर त्यांनी
'जाती धर्म का ना हो झगडा भाई बंधू का नाता रहे,
हम सब एक हा भारत वासी कंठ हमारा दाता रहे।' हि कविता सादर केली. कवी डॉ वफा सुल्तानपुरी यांनी आजच्या देशाचा युवकांमध्ये विविध विचार जे पेरण्यात येत आहेत त्या बद्दल टीका करतांना म्हणाले...
“एहसास के सिनो मीन जलन देख रहा हु
शोलो मे झुल्स्ता मे वतन देख रहा हु
जेह्नो मे जवानो के जो बारूद भरा है
हर घर के दरीचोन मे घुटन देख रहा हु “....
पुढे कवी उमाकांत वर्मा यांनी मराठी मध्ये एक सुंदर गजलचे पठन केले.
“सूरज कभी पश्चिम से निकलते नहीं देखा , सितारों को दिन में निकलते नहीं देखा
गीता के हो श्लोक या कुरान की आयत
दोनों के ही सारांश बदलते नहीं देखा”...
कवी विदेह महाराज यांनी आपल्या विशिष्ट शैलीत एकात्मतेवर अतिशय चांगली कविता सादर केली. ती खालीलप्रमाणे ...
“न मस्जिद की बात हो न शिवालयों की बात हो
मेरे जवान बेरोज़गार है पहले निवालों की बात हो”..., “आप योग करे न करें,
लेकिन समय मिलने पर एक दूसरे का सहयोग जरूर करे”...
उबेद आज़मी यांनी अतिशय उत्तम शायरीचे पठन केले
“दीवार उठाने की तिजारत नहीं आयी,
दिल्ली में रहे और सियासत नहीं आयी ।
दिल सबका भला कर के गुमनाम है अबतक,
इस शख्स के हिस्से में शोहरत नहीं आयी”...
पुढे मुंब्रा येथील कवी इरफान जाफरी यांनी आपल्या वेगळ्या शैलीत
“राह देखेंगे तेरी चाहे जमाने लग जाये
या तो आ जाये तू या हम ही ठिकाने लग जाये” हि शायरी ऐकवली.
एजाज़ हिंदी यांनी "इस दौरे कयामत में हर पल इंसान बदलते रहते है, ये दुनीया है,इस दुनीया में सुल्तान बदलते रहते है".... हि कविता आपल्या अंदाज मध्ये सादर केली. शेवटी संमेलन अध्यक्ष प्रसिध्द कवी जनाब जावेद नदीम यांनी आपल्या कविता सादर केल्या. त्यानंतर सैफ आसरे यांनी जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या मोहिमची माहिती देऊन त्या मागील उद्देश स्पष्ट केला.