लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या अनेक दिवसांपासून खंडणीच्या गुन्हयांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग याच्याविरुद्ध अखेर गुरुवारी ठाणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. केंद्रीय इमिग्रेशन खात्याला हे पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात ३० जुलै २०२१ रोजी खंडणी वसूलीचा गुन्हा दाखल झाला आहे. क्रि केट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तब्बल दोन दिवस तक्रारदाराचा जबाब नोंदविल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. परमबीर यांच्यासह निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम आदी अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातच परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. परमबीर यांच्याच आदेशाने प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकाºयांनी धमक्या देऊन साडे तीन कोटी रु पये उकळल्याचा गंभीर आरोप क्रि केट बुकी सोनू जालान आणि केतन तन्ना यांनी केला होता. त्याआधी कोपरी पोलीस ठाण्यातही २३ जुलै २०२१ रोजी परमबीर सिंग, उपायुक्त पराग मणेरे यांच्यासह पाच जणांविरुद्ध चार कोटी ६८ लाख रुपये खंडणी वसूलीचा गुन्हाही दाखल झालेला आहे. हे दोन्हीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे असल्याने याप्रकरणी लूक आऊट नोटीस जारी केल्याच्या वृत्ताला पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनीही दुजोरा दिला आहे.आता या नोटीसमुळे परमबीर सिंग यांना परदेशात जाता येणार नाही. ते परदेशात पळून जाण्याची शक्यता व्यक्त करीत केतन तन्ना यांनी त्यांच्यासह २८ आरोपींविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्याची मागणी ठाणे पोलिसांकडे अलिकडेच केली होती.
मुंबई- ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अखेर लूक आऊट नोटीस जारी
By जितेंद्र कालेकर | Published: August 12, 2021 11:56 PM
गेल्या अनेक दिवसांपासून खंडणीच्या गुन्हयांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग याच्याविरुद्ध अखेर गुरुवारी ठाणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे.
ठळक मुद्देठाणे पोलिसांनी दिले इमिग्रेशन विभागाला पत्र