लोकमत न्यूज नेटवकठाणे : लोहमार्ग पोलिसांनी तडीपार केलेल्या कुणाल सुरेश जगताप (२४, रा. सिद्धार्थनगर, कोपरी, ठाणे) या गुंडाला कोपरी पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२ नुसार कारवाई करण्यात आली आहे.ठाणे रेल्वे पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला परंतू हद्दपार केलेला गुंड कुणार जगताप हा कोपरी परिसरात वास्तव्य करीत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांच्या मार्गदर्शनाखाली पठाणे यांच्या पथकाने १२ नोव्हेंबर रोजी पहाटे ६.५० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याला सकाळी १०वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला मुंबई लोहमार्गच्या मध्य परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांनी १७ डिसेंबर २०१९ रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्हयांमधून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. तरीही कोणतीही परवानगी न घेता तो कोपरी भाजी मार्केट परिसरात आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध मुंबई लोहमार्ग मध्य परिमंडळाचे पोलीस उपायुक्त यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई रेल्वे पोलिसांनी तडीपार केलेल्या गुंडाला कोपरीतून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:31 PM
लोहमार्ग पोलिसांनी तडीपार केलेल्या कुणाल सुरेश जगताप (२४, रा. सिद्धार्थनगर, कोपरी, ठाणे) या गुंडाला कोपरी पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. त्याला मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्हयांमधून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते.
ठळक मुद्दे कोपरी पोलिसांची कारवाई मुंबई शहरासह पाच जिल्हयातून केले तडीपार