ठाणे - ऐन गर्दीच्या वेळी गुरुवारी (22 ऑगस्ट) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-ठाणे दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. कळवा येथील लेव्हल क्रॉसिंग गेट जास्त काळ सुरू ठेवल्याने कल्याण-ठाणे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दोन्ही धीम्या मार्गावरील गाड्या ठप्प आहेत. बुधवारी देखील याच कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळवा येथील लेव्हल क्रॉसिंग गेट जास्त काळ सुरू ठेवल्याने कल्याण-ठाणे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच मध्य रेल्वेची सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक उशिराने सुरू आहे. कल्याण, डोंबिवलीहून दररोज हजारो प्रवासी सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करतात. आज लोकल उशिराने सुरू असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.