शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नौकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
2
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
3
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून खास शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
4
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
5
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
6
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
7
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
8
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
9
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
10
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
11
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
12
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
13
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
14
Ganesh Visarjan 2024 Live: गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
15
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
16
दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य...
17
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट
18
टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात
19
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
20
IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर 

Mumbai Train Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 9:17 AM

Mumbai Train Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे.

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. टिटवाळा स्टेशनदरम्यान एक्स्प्रेस रखडली आहे. यामुळे अनेक लोकल गाड्याही अडकल्या आहेत. तसेच कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी टिटवाळा स्टेशन दरम्यान गीतांजली एक्स्प्रेसमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेस रखडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. इंजिनमधील बिघाड दुरूस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र यामुळे कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद आहे. तसेच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

 मुंबईकरांची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी लोकल मार्गावर गेल्या २० वर्षांत २३ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच विविध अपघातांत २६ हजार ५७२ प्रवासी जखमी झाले. विशेष म्हणजे, पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात ही धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे.

मध्य रेल्वेवर १५ वर्षांत २९ हजार मृत्यू

मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर १५ वर्षांत २९ हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शशी ऋषन यांनी बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली. पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर अपघाती बळींची संख्या अधिक आहे. २००९ ते जून २०२४ दरम्यान रेल्वे रूळ ओलांडणे, ट्रेनमधून खाली पडणे, खांबाला धडकणे, प्लॅटफॉर्म व फुटबोर्डच्या जागेत सापडणे आदी अपघातांत २९,३२१ प्रवाशांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Mumbai Train Updateमुंबई ट्रेन अपडेटcentral railwayमध्य रेल्वेkalyanकल्याणrailwayरेल्वे