ठाणे - मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी (21 जानेवारी) विस्कळीत झाली आहे. एलटीटी पाटणा एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. ठाकुर्लीदरम्यान पाटणा एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडलं आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ही 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये सध्या प्रचंड गर्दी आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ठाकुर्लीदरम्यान पाटणा एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्याने कल्याणकडून ठाण्याकडे येणाऱ्या जलद मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच जलद वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक ही उशिराने सुरू आहे. कल्याण, डोंबिवलीहून दररोज सकाळी हजारो प्रवासी सीएसटीएमच्या दिशेने प्रवास करतात. मात्र आज सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक जवळपास 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Election : ...म्हणून केजरीवालांना दाखल करता आला नाही उमेदवारी अर्ज
Video: मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; ट्वविटरवरील 'त्या' व्हिडीओमुळे संताप
आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या, देशातील पहिलाच प्रयोग
Delhi Election : भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली
शासकीय दस्तऐवजातही पाथरीच साईबाबांची जन्मभूमी असल्याची नोंद