ठाणे : तब्बल चार महिन्यांच्या दुरुस्तीच्या कामानंतर अखेर मुंब्रा बायपास सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार असून भाजपाचे १० नेतेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. या पुलासाठी मागील कित्येक महिने राष्टÑवादी आणि शिवसेनेमध्ये श्रेयासाठी रस्सीखेच सुरूहोती. परंतु, आता श्रेयाच्या लढाईत भाजपाने बाजी मारली आहे.मुंब्रा बायपास मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या महामार्गावरील अपघातांचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे राज्य शासनाने या मार्गाच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, ८ मे रोजी या पुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली होती. दुरु स्तीच्या काळात हा मार्ग पूर्णपणे बंद केल्याने पोलिसांनी वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून नियोजन केले होते. मात्र, तरीही या कालावधीत ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह भिवंडीतील नागरिकांना काही प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. दुरुस्तीच्या कामामध्ये डेस्कलॅब तोडून नवीन बांधण्यात आला असून बेअरिंगचे काम करण्यात आले आहे.याशिवाय, खड्डेदेखील भरले आहेत. हा पूल वाहतुकीसाठी लवकर खुला करावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारासुद्धा दिला होता. मात्र, त्याआधीच हा पूल वाहतुकीसाठी खुला होत असल्याने राष्टÑवादीला आंदोलन मागे घ्यावे लागले आहे. शिवसेनेकडूनसुद्धा या बायपासचे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. गेले काही दिवस ठाण्यात वेगवगेळ्या कामांचे श्रेय घेण्यावरून चढाओढ सुरू आहे.>वाहनचालकांना दिलासामुंब्रा बायपासवरून दररोज १५०० अवजड वाहनांची वाहतूक होत असते. या सर्व वाहनांचे नियोजन करताकरता वाहतूक पोलिसांची दमछाक झाली होती. आता तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याने वाहतूक पोलिसांबरोबरच वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
मुंब्रा बायपासचे उद्या मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन, शिवसेना-राष्ट्रवादी बॅक फूटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 3:35 AM