शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

मुंब्रा बायपास होणार १० सप्टेंबरला खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 4:45 AM

कोंडीतून होणार सुटका : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

ठाणे : मुंब्रा बायपास रस्ता, पूल सर्व प्रकारच्या अवजड व जड आदी सर्व वाहनांसाठी १० सप्टेंबरला खुला होणार आहे. यामुळे जिल्ह्यात सुरू असलेली जीवघेणी वाहतूककोंडी आता कायमची सुटणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी बैठक झाली. त्यात जिल्ह्यातील वाहतूककोंडी, रस्त्यातील खड्डे आणि मुंब्रा बायपास, मुंब्रा पूल दुरु स्ती यावर चर्चा झाली. सुमारे तीन आठवड्यांपूर्वी या समस्यांविषयी बैठक घेऊन पालकमंत्र्यांनी आढावा घेतला होता. त्यात ठरल्याप्रमाणे पनवेल बांधकाम विभागाने युद्धपातळीवर काम करून १० सप्टेंबरची डेडलाइन पाळून मुंब्रा पूल व बायपास रस्त्याचे काम पूर्णत्वास आणले. दरम्यान, हा रस्ता वेळेत सुरू करावा, यासाठी आपण बांधकाम विभागाला तंबी दिल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

या पुलाच्या दुरु स्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व प्रकारची खबरदारी घेऊन हे काम पूर्णत्वास आणले. याशिवाय, सर्व पालिका हद्दीतील व ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे पॉलिमरसारखे तंत्रज्ञान, रेडी मिक्स वगैरेसारख्या पद्धतीने तातडीने बुजवले जात आहे. आगामी गणेशोत्सव व अन्य सणासुदीच्या कालावधीत दुर्दैवी घटना घडू नये, जीवघेणी दुखापत होऊ नये, यासाठी नवनिर्वाचित जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी वाहतुकीची कोंडी सोडवण्याला प्रथम प्राधान्य देऊन मुंब्रा बायपासचे काम प्राधान्याने करणे व खड्डे भरण्याकरिता उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मुंब्रा बायपास दुरु स्ती तसेच एकूणच वाहतूककोंडीवर विस्तृत चर्चा झाली.वाहतूककोंडीतून होईल मुक्तताच्मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंब्रा रस्त्यावरील काही भाग खचला, त्यामुळे नवी समस्या निर्माण झाली होती. या रस्त्यालगत बायपासवर काही घरे होती. पर्यायी तात्पुरती निवासव्यवस्था करूनही ती कुटुंबे तिथून न गेल्याने दुरु स्तीला उशीर होत गेला. हा बायपास सुरू होताच जिल्ह्यातील वाहतूककोंडी दूर होईल.च्भिवंडी येथील गोदामांच्या वाहतुकीस नियंत्रणात येईल. अवजड व जड वाहनांची कोंडी दूर होईल. उरण, जेएनपीटी तसेच पालघरकडून येणारी वाहनेदेखील नियंत्रित होतील. तलासरी-दापचरीकडून येणारी वाहने याविषयीदेखील या आढावा बैठकीत चर्चा झाली.

टॅग्स :thaneठाणेmumbraमुंब्राroad safetyरस्ते सुरक्षा