भिवंडी: शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून वंजारपट्टी नाका ते अंजुर फाटा तसेच कल्याण भिवंडी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी प्रवाशांसह नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी ठरली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून ही अतिक्रमणे मनपा प्रशासनाकडून दुर्लक्षित केली जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त वाहन तळ उभारण्यात मनपा प्रशासनास अपयश आल्याने शहरात कामानिमित्त अथवा वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या गाड्यांवर व दुचाकींवर वाहतूक पोलिसांकडून तसेच टोइंग व्हॅन वाले उचलून घेऊन जात असल्याने चालकांसह नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
भिवंडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मनपा मुख्यालय,उपजिल्हा रुग्णालय,बँक,तहसीलदार कार्यालय,प्रांत कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,तालुका पोलीस ठाणे,एसीपी व डीसीपी कार्यालय,भिवंडी न्यायालय,बस आगार,सिनेमागृह,राजकीय नेते व आमदार खासदार यांची कार्यालये आहेत.त्यामुळे येथे रोजच हजारो नागरिकांसह प्रवाशांची ये जा असते मात्र या ठिकाणी मनपाने कोणतेही वाहन तळ उभारले नसल्याने नागरिकांना आपल्या गाड्या रस्त्यावरच पार्क कराव्या लागतात.उड्डाणपुलाखाली वाहन पार्किंग करू शकत नसल्याचा शासकीय आदेशकडे बोट दखवून येथील उड्डाणपुलांखाली सुशोभीकरणाच्या नावाखाली उड्डाणपुलाखालील जागा बंदिस्त करण्यात आली आहे.त्यामुळे नगरिकांना आपली वाहने पार्क करतांना मोठी अडचण निर्मण झली आहे.
रस्त्यावर होणाऱ्या व्हॅन पार्किंगमुळे शहरात टोईंग व्हॅन वलीनकडून करवी करण्यात येते मात्र य टोईंग व्हॅनच्या मध्यमतून मोठी आर्थिक वसुली होत असल्याने टोईंग व्हॅनवाले वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्या ऐवजी फक्त वसुलीकडे लक्ष देत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. वाहन तळाच्या नावाने मनपा प्रशासनाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आरक्षित जागेवर वाहन तळ उभारले आहे.नोव्हेंम्बर २०२१ मध्ये या वाहन तळाचे उदघाटन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील त्यांच्या हस्ते झाले होते.मात्र हे वाहन तळ शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी उपयोगी नसल्याने उदघाटना नंतर अवघ्या काही दिवसांमध्येच बंद पडले.ते आजपर्यंत बंदच आहे.त्यामुळे भिवंडीत वाहतूक कोंडी व वाहन पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे.