उल्हासनगर : आधी १९५ रूपयांना दाखवलेल्या कचºयाच्या डब्याच्या खरेदीवर टीका झाल्याने पलिका आयुक्तांनी तो १४५ रूपयांना खरेदी केल्याचे दाखवून पालिकेचे पैसे वाचवल्याचा दावा केलेला असतानाच शिवसेना सदस्यांनी जीएसटीसह तो ८० रूपयांना खरेदी केल्याचे बिल सादर करून या खरेदीतील गैरव्यवहाराचा भांडाफोड करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे या डबे खरेदीला स्थगिती देण्यात आली.उल्हासनगरच्या स्थायी समितीची बैठक सोमवारी पार पडली. त्यात पावसाळयापूर्वी रस्त्यातील खड्डे भरण्याच्या विषयाला आणि वडोल पुलाच्या वाढीव कामाला बहुमताने स्थगिती देण्यात आली. या बैठकीत १७ विषय घेण्यात आले. त्यात जागला तो कचरा डबा खरेदीचा विषय. स्वच्छता अभियानांतर्गत ओला-सुका कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी पालिकेने सहा कोटीच्या निधीतून १० लिटरचे कचºयाचे डबे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यावर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पुढाकार घेत १९५ रूपयांना आधी खरेदी केलेला डबा १४५ रूपयांना खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यातून पालिकेचे तब्बल सव्वा कोटी वाचल्याचा दावा प्रशासनाने केला. हा विषय स्थायी समिती सभेत आल्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी महापालिका खरेदी करीत असलेला डबाच जीएसटी बिलासह ८० रूपयांना खरेदी केला आणि आयुक्तांना डब्यासह ते बिल सादर केले. त्यातून या खरेदीतील सावळागोंधळ उघड झाल्याने अखेर हा विषय स्थागित ठेवण्यात आला.वडोलगाव वालधुनी पुलाचे काम दोन कोटी २० लाखाच्या निधीतून सुरू आहे. त्यात सव्वा कोटींचे वाढीव काम दाखविल्याने नगरसेवकांसह आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. रस्त्यातील खड्डे भरण्याचा सविस्तर अहवाल ठेकेदाराने व बांधकाम विभागाने सादर करण्यास सांगण्यात आले. सहा कोटीच्या निधीतून रस्त्यातील खड्डे भरण्यात सहा कोटीचे वाढीव काम दाखविल्याने साई पक्षाचे टोनी सिरवानी, राजेंद्र चौधरी आदींनी विरोध केला. त्यामुळे २ फेबु्रवारीच्या स्थायी समितीच्या सभेत तिन्ही विषय पुन्हा घेणार असल्याचे स्थायी समिती सभापती कंचन लुंड यांनी दिली.५६ उद्यानांचे सुशोभीकरणशहरातील बहुतांश उद्यानाची दुरवस्था झाली असून १७ कोटी खर्चून त्यांच्या सुशोभिकरणाला स्थायी समितीने मंजुरी दिली. ५६ पैकी १७ उद्यानांच्या नुतनीकरणाचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.सुरक्षारक्षकांना १४ हजारपालिकेच्या सुरक्षारक्षकांना गणवेशाऐवजी १४ हजार रोख दिले जाणार आहेत. रक्षकांनी दोन गणवेशांसह टोपी, पट्टा व इतर साहित्य खरेदी करण्याची अट प्रस्तावात आहे. तसेच इतर लहान-मोठया प्रस्तावांना स्थायी समितीने मंजुरी दिली.
पालिकेचा डब्बा गुल, वादग्रस्त वडोलपुलाच्या कामाला स्थगिती , उल्हासनगर स्थायीत भंडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 7:11 AM