ठाणे - यापुढे प्रत्येक मंगळवारी आयुक्तांसमवेत ठाणे महापालिकेतील सर्व विभाग रस्त्यावर उतरून खड्ड्यांबरोबरच इतर सर्वच समस्या सोडवणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची पाहणी मंगळवारी आयुक्तांनी केली. यावेळी खड्डे कशाप्रकारे बुजवले जात आहेत याचा आढावा देखील घेतला. आयुक्तांच्या या निर्णयामुळे गेले अनेक वर्ष पावसाळयात रस्त्यावर न उतरणारे पालिकेचे अधिकारी चांगलेच कामाला लागले आहेत. त्यानुसार एका दिवसात तब्बल ११५० चौरस मीटरचे खड्डे बुजविण्यात आले आहेत. मागील १० दिवसांपासून तुफान बॅटिंग करणाऱ्या पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत: रस्त्यावर उतरून खड्ड्यांची पाहणी करावी लागली. त्यानंतर मंगळवारी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वत: रस्त्यावर उतरून खड्ड्यांची पाहणी केली. पातलीपाडा येथून पालिका आयुक्तांच्या दौºयाला सुरु वात झाली. त्यानंतर वाघबीळ, खोपट, स्टेशन परिसर, मीनाताई ठाकरे चौक, रेतीबंदर, साकेत, कळवा अशा अनेक परिसरात फिरून त्यांनी खड्ड्यांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे हा आढावा घेताना खड्डे बुजवण्याचे काम कशा पद्धतीने सुरु आहे याची पालिका आयुक्त बारकाईने पाहणी करत होते. खड्डे कोणाच्याही मालकीचे असले तरी ते बुजवण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिल्यामुळे ठाणे शहरात खड्डे बुजवण्याच्या कामाला देखील वेग आला आहे. शहरातील खड्ड्यांचा आढावा घेतल्यानंतर शहरातील परिस्थिती फारशी वाईट नसली तर गेले १० दिवस पाऊस मोठ्या प्रमाणात पडला असल्याने काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक जॉर्इंट तुटले आहेत तर ज्या ठिकाणी केबल टाकण्याची कामे करण्यात आली आहे त्या ठिकाणी खड्डे पडले असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.या दौºयानंतर पालिकेत आयुक्तांनी महत्वाचा निर्णय घेतला असून आयुक्तांच्या या निर्णयामुळे पालिका अधिकारी चांगलेच कामाला लागणार आहेत. पावसाळयात खड्डे ही मुख्य समस्या असली तरी पावसाळ्याच्या अनुषंगाने नागरिकांना इतरही समास्यांना तोंड द्यावे लागत असल्याने यापुढे प्रत्येक मंगळवारी पालिकेच्या सर्व विभागाच्या अधिकाºयांना रस्त्यावर उतरावे लागणार आहे. यामध्ये विद्युत, घनकचरा, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा, वृक्ष प्राधिकरण विभाग अशा सर्व विभागाचे अधिकारी स्वत: आयुक्तांसमवेत रस्त्यावर उतरणार असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. जो पर्यंत अधिकारी स्वत: रस्त्यावर उतरणार नाही तोपर्यंत नागरिकांच्या समस्या जाणून घेता येणार नाही असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहेचौकट -महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह आख्खी यंत्रणा खडडे बुजविण्यासाठी रस्त्यावर उतरली असून यामध्ये जवळपास ३०० इंजिनिअर्स, १ हजार कामगार, ६० डंपर, ३० जेसीबीच्या साहाय्याने रेडीमिक्स काँक्र ीट वापरून जवळपास ७५० चौरस मीटरचे खड्डे भरण्यात आले तर पेव्हरब्लॉकच्या साहाय्याने ४०० मीटरचे खड्डे भरण्यात आले. तसेच या पाहणी दौºयामध्ये खड्डे, नाले सफाई, फुटपाथ, स्वच्छता आणि उद्यान विभागाच्या कामाची पाहणी केली.त्याचबरोबर ९ प्रभाग समितीमधून जवळपास ३० डंपर होईल एवढ्या छाटलेल्या आणि पडलेल्या झाडांच्या फांद्या उद्यान विभागाच्या जवळपास १०० कामगारांच्यामार्फत उचलण्यात आल्या. या सर्व फांद्या महापालिकेच्या कोपरी येथील लाकडापासून जळावू विटा बनविण्याच्या प्रकल्पामध्ये पाठविण्यात आल्या. घनकचरा विभागाच्यावतीने ३ हजार कर्मचाºयांच्या माध्यमातून सकाळी ६ वाजल्यापासून शहरात रस्ते साफसफाई, गटर सफाईचे काम सुरू होते. तर ४०० कामगारांच्या माध्यमातून कचरा उचलण्याचे काम सुरू होते.चौकट - ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्याच्या पाहणी दौºया दरम्यान महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शहरातील विविध परिसरातील रिक्षा चालक, स्थानिक नागरिक, सफाई कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी यांच्याशी थेट संवाद साधला. अतिवृष्टीच्या पाशर््वभूमीवर रस्त्यावरील खड्यांचा शहरवासियांना त्रास होऊ नये, याकरिता महापालिकेच्या संपूर्ण यंत्रणेसह आज महापालिका आयुक्तांनी शहरातील रस्त्यांचा पाहणी दौरा केला. यावेळी रिक्षाचालकांनीही मोकळेपणाने संवाद साधत शहरातील खड्ड्याची योग्य ती माहिती आयुक्तांना दिली.
पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला रस्त्यांचा पाहणी दौरा, एका दिवसात बुजविले ११५० चौरस मीटरचे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 5:15 PM
मागील १० दिवसापासून कोसळणाºया पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी याची दखल घेत, मंगळवारी रस्त्यावर उतरुन शहरातील रस्त्यांची पाहणी केली. तसेच दिवसभरात ११५० चौरस मीटरचे खड्डे बुजवून घेतले.
ठळक मुद्देप्रत्येक मंगळवारी पाहणी दौरा करण्याचा आयुक्तांचा निर्धारपालिकेतील प्रत्येक विभागाला लावले आयुक्तांनी कामाला