शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

‘सफाई मित्रांचा’ महापालिकेकडून सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:37 AM

मीरारोड : केंद्र सरकारच्या सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेकडून सफाई मित्र व जनजागृती अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचा ...

मीरारोड : केंद्र सरकारच्या सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेकडून सफाई मित्र व जनजागृती अभियानात सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

शहरी विकास मंत्रालय भारत सरकारमार्फत १९ नोव्हेंबर २०२० पासून देशातील २४३ शहरांमध्ये सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज अभियान सुरू करण्यात आले आहे. मलनिस्सारण वाहिनी, सेप्टिक टँक व मॅनहोलमध्ये कार्यरत कामगारांना सफाईसाठी अधिकृत आणि शाश्वत यंत्रणेमध्ये समावेश करून घेणे हा मुख्य उद्देश या अभियानाचा आहे. जीवितहानी टाळण्यासाठी मलनिस्सारण वाहिनी, सेप्टिक टँक व मॅनहोलमध्ये मानवी वापर कमी करून यांत्रिकीकरणाच्या साफसफाईला प्रोत्साहन देण्यावर भर असणार आहे.

सफाईमित्रांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्याकरिता शुक्रवारी ३० जुलै रोजी मीरारोडच्या जीसीसी क्लब येथे सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त संभाजी पानपट्टे, सहायक आयुक्त सचिन बच्छाव, शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, सुरेश वाकोडे, किरण राठोड व जनसंपर्क अधिकारी राजकुमार घरत, शहरी विकास मंत्रालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ अंतर्गत पाणी पुरवठा विभागाद्वारे सुरु करण्यात आलेल्या सफाईमित्र उद्यमीकरण आणि उन्नतीकरण प्रोत्साहन योजना, सफाईमित्र इंटर्नशिप प्रोग्रॅम, सफाईमित्र चित्रकला सप्ताह आदी उपक्रम राबवले. सफाईमित्रांना युनिफॉर्म, सुरक्षा किट आणि प्रमाणपत्र त्यासोबतच स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र, शाळकरी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम झाला.

शहरी विकास मंत्रालयाच्या सूचनेनुसार या कार्यक्रमामध्ये लोन मेळावादेखील आयोजिला होता. त्यात महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ आणि राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिकारी सहभागी झाले होते. पाणी पुरवठा विभागद्वारा सफाईमित्र सुरक्षा चॅलेंजअंतर्गत राबविल्या गेलेल्या विविध संकल्पनांचा लेखाजोखा अप-रायझिंग : आपला मित्र, सफाईमित्र या पुस्तकाचे प्रकाशन आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.

सफाईमित्र इंटर्नशिप प्रोग्रामद्वारे जनजागृतीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंटर्नशिप देऊन युवकांचा या अभियानामध्ये सक्रिय सहभाग करून घेतला जात आहे. लॉकडाऊन आणि कोरोना परिस्थिती असतानादेखील पाणी पुरवठा विभागाद्वारे ‘सफाईमित्र ऑनलाइन टॉक सिरीज’ सुरू करण्यात आली.

केंद्र सरकारच्या सफाईमित्र सुरक्षा च`लेंज अभियानअंतर्गत मीरा भाईंदर महानगरपालिकेमार्फत सेप्टिक टँक, मलनिस्सारण वाहिनी, मॅनहोल संबंधित तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक १४४२० आणि व्हॉटसॲप क्रमांक ८६५७९०६८८० सुरू करण्यात आलेले आहे. नागरिकांनी तक्रार नोंदणीसाठी या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त ढोले यांनी केले आहे.