शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

मीरा- भाईंदरमध्ये पालिकेने सुरु केला फिरता दवाखाना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 6:14 PM

पालिकेची प्राथमिक उपचार केंद्र असली तरी लांब व आदिवासी पाड्यातील नागरिकांना मात्र पालिका दवाखान्यात येणे लांब व खर्चिक पडत होते.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने रुग्णवाहिकेत फिरता दवाखाना सुरु केला असून त्याचे लोकार्पण महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते मंगळवारी केले गेले . आदिवासी पाडे , नागरी वस्ती पासून तसेच पालिका आरोग्य केंद्रा पासून लांब असलेल्या परिसरातील नागरिकांसाठी हि सुविधा सुरु केल्याचे आयुक्त म्हणाले. 

पालिकेची प्राथमिक उपचार केंद्र असली तरी लांब व आदिवासी पाड्यातील नागरिकांना मात्र पालिका दवाखान्यात येणे लांब व खर्चिक पडत होते. त्या अनुषंगाने पालिकेच्या रुग्णवाहिकेचा फिरता दवाखाना बनवण्यात आला असून त्यात डॉक्टर व परिचारीका तैनात असतील. 

माता व बालआरोग्य बाह्य रुग्ण तपासणी,  गरोदर माता तपासणी, अनाथआश्रम, वृद्धाश्रमातील नागरिकांची तपासणी, उपोषणासाठी बसणाऱ्या व्यक्तींची तपासणी, क्षयरोग कार्यक्रम, कुष्ठरोग कार्यक्रम अंतर्गत नागरिकांची तपासणी इत्यादी मूलभूत सेवा या फिरत्या दवाखान्यात असतील . सोमवार (केशवसृष्टी, पाली चौक, वृध्दाश्रम - उत्तन परिसर),  मंगळवार (माशाचापाडा, मांडवीपाडा, मीनाक्षी नगर), बुधवार (रेतीबंदर, चेना, काजूपाडा), गुरुवार (मुंशी कंपाउंड , मिरागाव, मिरा गावठण), शुक्रवार (आयडील पार्क - कन्स्ट्रक्शन साईट, वृध्दाश्रम - मिरागाव परिसर, वृध्दाश्रम - पेणकरपाडा व काशिगाव परिसर), शनिवार (पहिला शनिवार - नाझरेथ पाडा, दुसरा शनिवार - वृध्दाश्रम, तिसरा शनिवार - डोंगरी, चौथा शनिवार - वृध्दाश्रम) या ठिकाणी वेळापत्रक नुसार फिरता दवाखाना उपलब्ध राहणार आहे.  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर