शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
2
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
3
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
4
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
6
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
7
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
8
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 
9
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
10
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
11
नवरात्रात लक्ष्मी नारायण योग: ९ राशींना अनुकूल, अचानक धनलाभ; अनेकविध शुभ फले, पण...
12
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
13
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
14
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
15
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
16
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
17
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
18
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
19
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
20
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?

 शेकोट्या पेटवताय मग सावधान! महापालिकेने केली ५३ जणांवर कारवाई, २ लाख ९ हजारांचा दंड वसुल

By अजित मांडके | Published: December 09, 2023 5:35 PM

मुंबई पाठोपाठ ठाण्याची हवा देखील प्रदुषीत झाली आहे. मागील महिनाभरात ठाण्याची हवा कमी जास्त प्रमाणात प्रदुषीत होत असल्याचे दिसत आहे.

ठाणे: मुंबई पाठोपाठ ठाण्याची हवा देखील प्रदुषीत झाली आहे. मागील महिनाभरात ठाण्याची हवा कमी जास्त प्रमाणात प्रदुषीत होत असल्याचे दिसत आहे. परंतु हे प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. महापालिकेच्या माध्यमातून रोजच्या रोज ५८.८० किमी रस्त्यांची धुलाई केली जात आहे. याशिवाय ८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत विविध आस्थापनांची पाहणी करुन उघड्यावर शेकोट्या पेटवणाºया ५३ जणांकडून २ लाख ९ हजारांचा आणि विकासकांच्या ठिकाणी वाहतुक करणाºया १३८ वाहनांवर कारवाई करुन ५ लाख १३ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तर ३५२ नव्याने उभ्या राहत असलेल्या गृहसंकुलांनाच्या ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली. असे असले तरी मागील महिनाभरात शहराची हवा कधी मध्यम तर कधी प्रदुषित गटात मोडली गेल्याचे दिसून आले. त्यातही सध्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२८ एवढा आढळला आहे.

शहरात आजही विविध ठिकाणी विकास कामे सुरु आहेत. मेट्रोची, महापालिकेच्या माध्यमातून रस्त्याची कामेही सुरु आहेत. त्यातही रोजच्या रोज होणारी वाहतुक कोंडी यामुळे प्रदुषणात वाढच होतांना दिसत आहे. शहरातील वाढते प्रदुषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शहरातील रस्त्यांची धुलाईची कामेही शहरात सुरु आहेत. वाहतुकीची वाढलेली वर्दळ आणि वाहतुक कोंडी यामुळे प्रदुषणात भर पडत आहे. त्यामुळे हे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने महत्वाचे पावले उचलली आहेत. त्यानुसार ७ नोव्हेंबर २०२३ पासून महापालिकेने मार्गदर्शक तत्वे जारी केली आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार विकासकामांच्या ठिकाणी वाहतुक करणाºया वाहनांनी प्रदुषण रोखण्यासाठी उपाय न केल्याने अशा १३८ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५ लाख १३ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. शिवाय ३५२ नव्या गृहसंकुलांच्या साईडला नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्या अनुषगांने काही ठिकाणी विकासकांना आता प्रदुषण होणार नाही, या दृष्टीने काही प्रमाणात उपाय योजना केल्याचे चित्र दिसत आहे.  

याशिवाय सध्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी हे चार महिने थंडीचे मानले जातात. त्यामुळे या कालावधीत थंडी पासून सुटका मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवल्या जातात. परंतु त्यावर देखील पालिकेने कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ५३ जणांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून २ लाख ९ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे. याशिवाय प्रदुषण रोखण्यासाठी आणि हवा संतुलित ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ३९ ठिकाणी १३ हजार २१० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय २१०० वृक्षांची लागवड ही मियावॉकी पध्दतीने केली आहे. तर ग्रीन कव्हर वाढविण्यासाठी २४ ठिकाणी १७८५ स्केअर मीटर परिसरात लॉन प्लन्टेशन करण्यात आले आहे. तर महापालिकेने प्रदुषण संदर्भात तक्रार करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर २२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याचे निराकरण करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

ठाणे महापालिका हद्दीत घोडबंदर, तीन हाता नाका आणि उपवन येथील हवा मध्यम प्रदुषीत गटात मोडत आहे. त्यातही तीन हातनाका परिसरातील हवा मागील काही दिवसात सुधारली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी येथील हवा अतिप्रदुषीत गटात मोडली गेली होती. परंतु आता तेथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १३५ पर्यंत आला आहे. याठिकाणी करण्यात आलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. परंतु दुसरीकडे उपवन येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक काही प्रमाणात बिघडतांना दिसत आहे. ४ डिसेंबर रोजी येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १८१ एवढा होता. तर ७ डिसेंबर रोजी १४९ एवढी दिसून आला.  सध्या ठाण्याचा एकूण  निदेर्शांक १२८ इतका आढळून आला आहे. तर ६ डिसेंबर रोजी १३८ असा आढळून आला होता. याचाच अर्थ हवेचा गुणवत्ता निर्देशांक वर खाली होतांना दिसत आहे.

तारीख - हवेचा गुणवत्ता निर्देशांक

  • १ डिसेंबर - १४६
  • २ डिसेंबर - १३०
  • ३ डिसेंबर - १३४
  • ४ डिसेंबर - १३८
  • ५ डिसेंबर - १२१
  • ६ डिसेंबर - १३८
  • ७ डिसेंबर - १२८ 
टॅग्स :thaneठाणे