कल्याण : शहरातील एकमेव सर्वात मोठे मैदान म्हणून सुभाष मैदानाकडे पाहिले जाते. या मैदानाच्या देखभालीकडे केडीएमसीच्या उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. ओपन जिमचे साहित्य तुटलेले आणि गंजलेल्या अवस्थेत असून मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांचे मन प्रसन्न करणारी सुगम संगीताची यंत्रणाही बंद पडली आहे. या एकूणच वास्तवाबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
शहरामध्ये नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी उपलब्ध मोजक्या ठिकाणांमध्ये सुभाष मैदानाचे नाव आवर्जून घेतले जाते. मॉर्निंग वॉकसाठी येणाºया नागरिकांची संख्या अधिक आहे. क्रीडापटू येथे सराव करतात, तसेच येथे दिवसभर विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्पर्धाही होतात. संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांच्या गप्पांच्या मैफलीही रंगतात. केडीएमसीतर्फे येथे ओपन जिमसारखी सुविधा देण्यात आली आहे. त्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या जिमचा नागरिक मोठ्या प्रमाणावर वापर करतात. जिमचे काही साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी त्याला गंजही पकडला आहे. त्यामुळे या साहित्यांचा वापर क रताना एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील पहिला मॉर्निंग वॉक स्पॉट म्हणूनही सुभाष मैदानाची ओळख आहे. पूर्वी येथे सकाळी वॉकसाठी येणाऱ्यांचे मन प्रसन्न करण्यासाठी सुगम संगीत वाजवले जात होते. ही यंत्रणा सध्या पूर्णत: बंद पडली आहे. त्याकडे महापालिकेच्या विद्युत विभागाचाही कानाडोळा झाला आहे. शुक्रवारी येथे मॉर्निंग वॉकसाठी आलेले भाजपचे कार्यकर्ते प्रशांत माळी यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर ओपन जिमचे तुटलेले साहित्य व बंद पडलेल्या स्पीकरचे फोटो व्हायरल करून नाराजी व्यक्त केली.साफसफाईची वेळ बदलावीनागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात, तेव्हा सफाई कामगारही साफसफाईसाठी दाखल होतात. त्यांच्या साफसफाईमुळे उडणारी धूळ मॉर्निंग वॉक करणाºयांच्या नाकातोंडात जाते. त्यामुळे या कामगारांची वेळ बदलून ती सकाळी १० ची ठेवावी, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती माळी यांनी दिली.तक्रार येते, तेव्हा तत्काळ दुरुस्ती केली जातेओपन जिमचा वापर करणाºयांची संख्या मोठी आहे. ज्या वेळेला तक्रार होते, तेव्हा त्याची दखल घेऊन जिमच्या साहित्याची तत्काळ दुरुस्ती केली जाते. सुगम संगीताचे स्पीकर बंद आहेत. त्याबाबत विद्युत विभाग स्पष्टीकरण देऊ शकेल. - संजय जाधव, उद्यान अधीक्षक, केडीएमसी