ठाणे: नौपाडा प्रभाग समितीतंर्गत जांभळी नाका मुख्य भाजीपाला मार्केट येथे ठाणे महापालिकेच्या विशेष पथकांकडून सोमवारी पहाटे लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये उपायुक्त संदीप माळवी यांच्या पथकाने पाच टेम्पोसह साहित्य जप्त केले. तसेच, ११ दुकानांवर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याबद्दल कारवाई केली. त्याचबरोबर ७ हातगाड्या तोडण्यात आल्या.
याशिवाय, पोलिसांच्या साहाय्याने सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांच्या पथकाने हाजुरी, कळवा नाका, जवाहर बाग अग्नीशमन केंद्र, कोपरी या ठिकाणीही धडक कारवाई केली.