शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

उघड्या चेंबरमध्ये पडून पालिका सुरक्षारक्षकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 4:21 AM

भोईर यांच्या अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी यामागे घातपात तर नाही ना? याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.

भिवंडी : मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील येवई (पांजरापोळ) येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या पाइपलाइनवरील उघड्या चेंबरमध्ये पडून गस्तीवरील सुरक्षारक्षक शिवराम बुधाजी भोईर (५७, रा. मोहाचा पाडा, पुंडास) यांचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. भोईर यांच्या अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी यामागे घातपात तर नाही ना? याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.पुंडास ग्रुपग्रामपंचायतीच्या उपसरपंच शर्मिला भोईर यांचे शिवराम हे पती होते. ते गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी रात्रपाळीला आल्यानंतर ते आपले कर्तव्य बजावत होते. पांजरापोळ येथून जवळच्या टेकडीवर असलेल्या पाण्याच्या पाइपलाइनची पाहणी करण्यासाठी ते गस्त घालत असताना अंधारात पाय घसरून ते पाच फूट खोल असलेल्या उघड्या चेंबरमध्ये पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.रविवारी दुपारी त्यांचे सहकारी सुरक्षारक्षक सचिन महाजन व संजय कारभल हे कामावर आले असता त्यांना भोईर यांची दुचाकी पाण्याच्या टाकीजवळ दिसली. भोईर यांचा शोध घेतला असता ते उघड्या चेंबरमध्ये मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्रेयन राठोड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.