मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या महेश नगर २ ह्या इमारतीतील ८ सदनिकाधारक कुटुंबियांना महापालिकेने एमआरडीएच्या भाडे तत्त्वावरील सदनिका राहण्यास दिल्या आहेत . विशेष म्हणजे ३९ सदनिकां पैकी केवळ ८ जणच मालक होते तर बाकी सर्व भाडेकरू असल्याचे स्पष्ट झाले आहे .
तौक्ते चक्रीवादळा दरम्यान मुसळधार पाऊस आणि वारा होता. १७ मे रोजी भाईंदर पश्चिम, शिवसेना गल्लीतील महेश नगर २ ह्या इमारतीच्या पहिल्या ते तिसऱ्या मजल्याची सामूहिक बाल्कनी कोसळून जिन्याचा मार्ग बंद झाला होता. सुमारे ४५ वर्ष जुनी इमारत असल्याने ती धोकादायक म्हणून पालिकेने पडून टाकली होती .
परंतु ह्या धोकादायक इमारतीच्या ३९ पैकी केवळ ८ सदनिकां मध्येच मूळ मालक रहात होते . बाकी सर्व भाडेकरू होते . जेणे करून मूळ मालक असलेल्या ८ कुटुंबियांना खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन तसेच नगरसेवक एड . रवी व्यास यांच्या पाठपुराव्या मुळे दहिसर चेकनाका येथे असलेल्या दर्वेश या एम.एम.आर.डी.ए इमारतीतील सदनिकां मध्ये पर्यायी पुनर्वसन करण्यात आले आहे . पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या दालनात खासदार राजन विचारे , आमदार गीता जैन , विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील , नगरसेवक रवी व्यास , राजू भोईर , गटनेत्या नीलम ढवण आदी उपस्थितांच्या हस्ते आपतग्रस्तांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या .