शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

काय चाललंय काय? मीरा भाईंदरमध्ये लसीसाठी पालिकेचे टोकन नगरसेवक वाटतात स्वत:च्या कार्यालयातून!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 9:14 PM

मीरा भाईंदर महानगरपालिकेची लस घेण्यासाठीची टोकन चक्क नगरसेवक स्वतःच्या कार्यालयात बसून वाटत असल्याचा व्हिडीओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कमीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिकेची लस घेण्यासाठीची टोकन चक्क नगरसेवक स्वतःच्या कार्यालयात बसून वाटत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पालिका टोकन घोटाळ्याच्या आरोपांना बळ मिळाले आहे. गंभीर बाब म्हणजे सामान्य नागरिकांना लस घेण्यासाठी टोकन मोठ्या हाल अपेष्टा सहन करून मिळत असताना नगरसेवकांना पालिकेची टोकन मिळणे म्हणजे लस साठी टोकनची काळाबाजारी असून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत महापालिकेच्या संगनमताने काही नगरसेवक, राजकारणी हस्तक्षेप करत वशिलेबाजी चालवत असल्याचे गैरप्रकार या आधी देखील उघडकीस येऊन सुद्धा महापालिका प्रशासन मात्र कारवाई ऐवजी गैरप्रकारांना संरक्षण व प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. 

ह्यापूर्वीही पालिकेच्या बंदरवाडी आरोग्य केंद्रात भाजपचे नगरसेवक रोहिदास पाटील व त्यांच्या कुटुंबिय, निकटवर्तीयना  थेट डॉक्टरांच्या दालनातच लसीकरण प्रमुख डॉ अंजली पाटील यांच्या समक्षच व्हीआयपी सेवा देत लस दिल्या गेल्याचे प्रकरण लोकमतने उघडकीस आणले होते.  विनायक नगर लसीकरण केंद्रांवर सुद्धा प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश जाधव आणि डॉ अंजली पाटील यांच्या समक्ष एका नगरसेविकेच्या निकवर्तीय ने स्वतःचे टोकन वाटल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. या शिवाय विविध ठिकाणी टोकन गैरप्रकार, वशिलेबाजीचे आरोप होत असताना पालिकेने अजूनही त्यावर कारवाई न करता गैरप्रकारांना पाठीशी घालण्याचा प्रकार चालवला असल्याची टीका होत आहे. त्यातच बुधवारी ८ सप्टेंबर रोजी महापालिकेने ३७ केंद्रांवर जंबो लसीकरण मोहीम ऑफलाईन पद्धतीने आयोजित केली होती.  त्यासाठी लसीकरण केंद्रांवर लोकांनी दिवस रात्र रांगेत उभे राहून टोकन घेतले व नंतर लस घेतली. तसे असताना महापालिकेत सत्ताधारी भाजपचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील मात्र लसीकरण केंद्रांवर दिली जाणारी टोकन स्वतःच्या खाजगी कार्यालयात बसून देत असल्याचा धक्कादायक प्रकार एक व्हायरल व्हिडीओ नेउघडकीस आला आहे. 

त्या व्हिडिओत एका व्यक्तीस पालिकेचे टोकन दिले व टेंबा येथे लसीकरण केंद्रांवर जाण्यास स्वतः पाटील यांनी सांगितले. एकीकडे सर्व सामान्य नागरिक लस आणि टोकन साठी दिवस - रात्र पाऊस पाण्यात तहान - भुकेची पर्वा न करता रांगेत हाल सहन करत तासन तास उभे राहतात. अनेक नगरसेवक, राजकारणी सुद्धा लसीच्या नियोजन साठी खटपट करत असतात. पण येथे मात्र नगरसेवक पाटील हे त्यांच्या खाजगी कार्यालयात बसून लस साठी टोकन देत असल्याने खळबळ उडाली आहे. पाटील यांच्या कडे टोकन आली कशी ? आणखी काही नगरसेवकांना सुद्धा अशी टोकन देण्यात आली आहे का ? असे प्रश्न काही नगरसेवकांसह राजकारणी यांना सुद्धा पडू लागले आहेत.

नागरिकांना टोकन व लस मिळणे अतिशय त्रासदायक होत असताना नगरसेवक मात्र पालिका टोकन चा काळाबाजार करत असल्याचा संताप  व्यक्त होत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. डॉ. प्रकाश जाधव म्हणाले की, व्हिडीओ निदर्शनास आला असून चौकशी केली जाईल असे सांगितले. महापालिका प्रशासन लाचार बनले असून त्यांची नगरसेवक वा राजकारण्यांवर कारवाईची हिम्मत नाही. पालिका फक्त सामान्य लोकांवरच कारवाईचा बडगा उगारून मर्दुमकी दाखवते अशी बोचरी टीका माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी केली आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकCorona vaccineकोरोनाची लस