शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कामावर उशिराने येणाऱ्या ३४ कर्मचाऱ्यांना बजावल्या पालिकेने नोटीस

By अजित घस्ते | Published: October 20, 2022 4:18 PM

ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. परंतु प्रभाग समिती असेल, आरोग्य विभाग असेल किंवा महापालिका मुख्यालय असेल अशा प्रत्येक ठिकाणी कर्मचारी, अधिकारी हे उशीरानेच येतांना दिसत आहेत.

ठाणे  : कामाच्या ठिकाणी उशिरा येणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने पावले उचलली असून त्यानुसार आतार्पयत तब्बल ३४  कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये एका कार्यालयीन अधिक्षकाचा समावेश आहे. केवळ महापालिका मुख्यालयातच नाही तर महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्तांमार्फत रोजच्या रोज हजेरी मस्टर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.   

ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. परंतु प्रभाग समिती असेल, आरोग्य विभाग असेल किंवा महापालिका मुख्यालय असेल अशा प्रत्येक ठिकाणी कर्मचारी, अधिकारी हे उशीरानेच येतांना दिसत आहेत. त्यामुळे  कामाच्या ठिकाणी अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल त्याने वेळेतच असा नियम आहे. मात्र हा नियम पाळला जात नसल्याचे दिसून आले आहे. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या संदर्भात आस्थापना विभागाने निर्देश दिले असून त्यानुसार अशा कर्मचा:यांना शिस्त लावण्यासाठी पावले उचलावीत असे सांगितले गेले आहे. त्यानुसार आता महापालिकेच्या आस्थापना विभागाकडून या संदर्भात पावले उचलण्यात आली आहेत.

कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आणि कामावर वेळेत येण्यासाठी महापालिकेमार्फत सध्या मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर्मचा:यांच्या विरोधात मागील आठवडय़ापासून पालिकेने मस्टरच गायब करुन उशिराने येणा:या कर्मचा:यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या दिवशी 3क् टक्के कर्मचारी हे कामाच्या ठिकाणी उशिराने आल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर आजही ही मोहीम सुरु असून आतार्पयत उशिराने येणा:या कर्मचा:यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र वारंवार सांगूनही कामात सुधारणा होत नसल्याने, अशा ३४ कर्मचा:यांना पालिकेने नोटीस बजावल्या असून कामाच्या ठिकाणी उशीर का होतो असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. यामध्ये एका कार्यलयीन अधिक्षकाचा समावेश आहे. त्यातही ज्यांना या नोटीस बजावण्यात आल्या आहेत, ते सलग तीन दिवस कामाच्या ठिकाणी गैरहजर राहिले असल्याचे दिसून आले आहे.

महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये देखील अशा स्वरुपाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार सहाय्यक आयुक्त १० वाजता मस्टर जमा करीत असून उशिराने येणा:या कर्मचा:यांपुढे रिमार्क लावत असल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :thaneठाणेMuncipal Corporationनगर पालिका