शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लोकसभेच्या लग्नाच्या मांडवात ‘कोकण पदवीधर’चीही ‘मुंज’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 10:00 AM

महायुती, मविआत अनेकांचे गुडघ्याला बाशिंग : एकास एक उमेदवार देण्यात यश येण्याबाबत साशंकता

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच ठाण्यात कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार निरंजन डावखरे भाजपकडून पुन्हा रिंगणात उतरणार, हे निश्चित मानले जाते. ठाण्यात शिंदेसेना, अजित पवार गट आणि उद्धवसेनेने निवडणुकीची तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढत असल्याने कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधील पक्ष डावखरे यांना पाठिंबा देणार का, अशी चर्चा सुरू आहे. 

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यापूर्वी २०१८ मध्ये झाली होती. त्यावेळेस भाजप आणि शिवसेना वेगळे लढले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील आपले नशीब अजमावले होते. त्यामुळे ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती. त्यात भाजपचे निरंजन डावखरे यांचा विजय तर शिवसेनेचे संजय मोरे यांचा पराभव झाला. 

आता कोकण पदवीधरसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. नव्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी भाजप, शिंदेसेना, अजित पवार गट, शरद पवार गट, काँग्रेस, उद्धवसेनेकडूनही मोर्चे बांधणी सुरू झाली. या निवडणुकीसाठी भाजपपाठोपाठ शिंदेसेना आणि अजित पवार गटाकडून दावा केला गेला. या निवडणुकीत शिंदेसेना आणि अजित पवार गट भाजपसाठी काम करेल, अशी शक्यता आहे. 

महाविकास आघाडीत आता लोकसभा निवडणुकीबाबत एकमत झाले आहे; परंतु कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हेच एकमत कायम राहील का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उद्धवसेनेकडून संजय घाडीगावकर, वरुण सरदेसाई, विजय कदम हे इच्छुक आहेत, तर शरद पवार गटाकडून अमित सरय्या यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडून मतदार नोंदणी सुरू आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक कोण लढणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. 

टॅग्स :Electionनिवडणूक