भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सभागृहनेतेपदी अपक्ष नगरसेवक श्रीप्रकाश जिलेदार सिंह ऊर्फ मुन्ना यांची झालेली निवड बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा अलीकडेच राज्य सरकारने पालिकेला पाठवलेल्या पत्रात दिल्याने त्यांच्या पदाला धोका निर्माण झाला आहे.पालिकेत सध्या सेना-भाजपा युतीची सत्ता आहे. यापूर्वी असलेली आघाडीची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राष्ट्रवादीच्या गोटात गेलेले अपक्ष नगरसेवक मुन्ना सिंह यांनी भाजपाला पाठिंबा दिला. त्याच्या मोबदल्यात भाजपाने मुन्ना यांना सभागृह नेतापदाची बिदागी दिली. याची घोषणा २४ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या विशेष महासभेत महापौर गीता जैन यांनी केली. परंतु, निवडून आलेल्या राजकीय पक्षांपैकी ज्या पक्षाचे संख्याबळ अधिक आहे, अशा पक्षातील सदस्याची निवड सभागृह नेतेपदी महापौरांच्या मान्यतेने करण्याच्या तरतुदीशी विसंगत असल्याने पालिकेने ३ मे २०१६ रोजी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून अभिप्राय मागवला होता. त्यावर सरकारने ११ महिन्यांनी हा अभिप्राय कळविला. (प्रतिनिधी)
अखेर मुन्ना सिंह यांची निवड रद्द
By admin | Published: January 12, 2017 5:54 AM