उल्हासनगर - कॅम्प नं-३ बाल्कनजी बारी परिसरात जुन्या भांडणातून अशोक शामराव वाघमारे या व्यक्तीचा शनिवारी रात्री १० वाजता निर्घृण खून करण्यात आली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ बाल्कनजी बारी परिसरात अशोक शामराव वाघमारे -३२ हा इसम कुटुंबासह राहतो. काही दिवसांपूर्वी परिसरातील काही मुलांसोबत अशोक याचे तू तू मैं मैं होऊन हाणामारी झाली होती. याचं रागातून शनिवारी रात्री -१० वाजता अशोक वाघमारे याला काही जणांनी गाठून धारदार शस्त्राने वार केले.
रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलेल्या अशोकला पोलिसांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी काही संशयीत इसमाला ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे..