नालासोपारा : पूर्वेकडील विली किड्स शाळेतील कराटे क्लास घेणाऱ्या शिक्षकाने वर्गातील सात विद्यार्थ्यांना २०० बैठका काढण्याची शिक्षा दिल्याची घटना शुक्रवारी घडली होती. त्यात एका विद्यार्थ्याच्या दोन्ही पायाच्या नसा जाम झाल्या असून मांसपेशी तुटल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या प्रकरणी पालकांनी तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शिक्षकाविरोधात सोमवारी गुन्हा दाखल झाला.वर्गात मस्ती करतात म्हणून सहावीत शिकणाºया श्रीगणेश कांबळे (१२) आणि त्याच्यासोबतच्या ६ विद्यार्थ्यांना शुक्रवारी मधल्या सुट्टीनंतर कराटे शिक्षक मणीभूषण चौधरी यांनी २०० बैठका काढण्याची शिक्षा दिली होती. त्यात श्रीगणेशची तब्येत बिघडली. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारल्यावर उडवाउडवीची उत्तरे देत त्या शिक्षकाला कामावरून काढल्याचे सांगितले. शाळेतील सीसीटीव्हीमध्ये सदर घटना कैद झाली असेल, अशी विचारणा केल्यावर ४ दिवसांपर्यंत रेकॉर्डिंग होत असल्यामुळे शुक्र वारचे फुटेज मिळणार नाही तसेच शिक्षकाला कामावरून काढून टाकल्याचे सांगत शाळा प्रशासनाने या प्रकरणी हात वर केले आहेत.श्रीगणेश शाळेतून घरी आल्यापासून बाहेर गेला नाही. दोन दिवसांनी त्याला विश्वासात घेऊन विचारल्यावर त्याने हकिकत सांगितली. सोमवारी शाळा प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या शिक्षकाचे नाव न सांगता काय करायचे ते करा अशी उर्मट भाषा वापरली.- गणेश कांंबळे, श्रीगणेशचे वडीलतक्रारीनंतर आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शाळेत व शाळेच्या आवारात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. लवकरच शिक्षकाला अटक करण्याचे आदेश तपास अधिकाºयाला दिले आहेत.- डॅनियल बेन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळिंज पोलीस ठाणे
दोनशे बैठकांच्या शिक्षेमुुळे विद्यार्थ्यांच्या मांसपेशी तुटल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 1:33 AM