- कुमार बडदे मुंब्रा : मुस्लिम समाज ज्या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाट बघतात, तो पवित्र रमजान महिना ५ मेपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रातील मतदानाचे चारही टप्पे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तारखांबाबत मुंब्य्रातील मुस्लिम समाज समाधानी आहे.मतदानाच्या तारखा निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. त्यानुसार ११, १८, २३ आणि २९ एप्रिलला चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर पाच दिवसांनी रमजान महिना सुरु होणार आहे. त्यामुळे रमजान महिन्यातील धार्मिक कार्य पूर्ण करु न मतदानाला कधी, कसे जायचे ही समस्या किमान महाराष्ट्रातील मतदारांना तरी भेडसावणार नाही. त्यामुळे मतदानाच्या तारखांबाबत राज्यातील मुस्लिम समाज समाधानी आहे. ज्या राज्यांमध्ये रमजान महिन्यादरम्यान मतदान होणार आहे, त्या राज्यांतील मतदारांनीही विनाकारण या बाबीचा उहापोह न करता मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मुस्लिम समाजातील प्रतिष्ठितांनी केले आहे.रमजान महिना सुरु होण्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात मतदानाची प्रक्रि या पार पडणार आहे. त्यामुळे राज्यात कोणतीही अडचण येणार नाही. परंतु देशातील ज्या राज्यांमध्ये रमजान महिन्यामध्ये मतदान होणार आहे, त्या राज्यांतील मतदारांनी लोकशाहीने त्यांना दिलेल्या मतदानाचा हक्क बजवावा. तारखांबाबत नाहक गाजावाजा करु नये.- हजरत मोईनउद्दीन उर्फमोईनमिया मुस्लिम समाज धर्मगुरूरमजान महिना सुरु होण्यापूर्वी राज्यात मतदान होत आहे, याबाबत समाधानी आहे. वार्षिक सुट्टया सुरु होण्यापूर्वी राज्यात मतदान होणार असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.- आशरीन राऊत नगरसेविका, ठामपारमजानच्या महिन्यांमध्ये मतदान आले असते तरी फरक पडला नसता. जेथे रमजान महिन्यात मतदान होणार आहे, त्या राज्यातील काही जण विनाकारण तारखांबाबत वाद निर्माण करीत आहेत. महाराष्ट्रात रमजानपूर्वी मतदान होत आहे, ही समाधानाची बाब आहे. - परवेझ खान, सामाजिक कार्यकर्ताराज्यातील मतदानाच्या तारखा योग्यच आहेत. नागरिकांनी मतदानाचा हक्क बाजावून नंतरच त्यांच्या मूळ गावी जावे.- अबू फैसल चौधरी, सरचिटणीस, मिल्ली तारीख संघटना
मतदानाच्या तारखांबाबत मुंब्य्रातील मुस्लिम समाधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:48 PM